Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यातील रेल्वे विकासाला गती मिळणार : खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून ते सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास केंद्रीय रेल्वे

नांदेडमध्ये विकास, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीवर रणसंग्राम
महापालिकेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
कार मध्ये गाईचे वासरू कोंबून नेणारे आरोपी पकडण्यात रामतीर्थ पोलिसांना आले यश

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून ते सर्व प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी आज व्यक्त केला आहे.  खा. डॉ. अजित गोपछडे यांनी मराठवाड्यातील विविध रेल्वे प्रश्नांच्या अनुषंगाने आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांबाबत सविस्तर निवेदनही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिले आहे. यावेळी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विकास कामे पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या कामाला आता गती मिळणार आहे.
नांदेड-पुणे आणि नांदेड-हैदराबाद वंदे भारत ट्रेन तात्काळ सुरू करण्यात यावे . धर्माबाद रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस व सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा.  नांदेड-बिदर नवीन रेल्वेमार्गाच्या कामास महाराष्ट्रातील भागात तातडीने सुरुवात करावी .  बोधन-बिलोली-नरसी-लातूर रोड (134 किमी) या नवीन रेल्वेमार्गास मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खा . डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी केली. नांदेड – बीदर या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्र सरकारने कर्नाटक व तेलंगणा राज्य सरकारांशी समन्वय साधून त्यांच्या 50 टक्के खर्चाच्या वाट्याबाबत आवश्यक पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. शिवाय मुदखेड-धर्माबाद (49 किमी) आणि परळी वैजनाथ-लातूर रोड-उदगीर (96 किमी) या रेल्वे मार्गांना हैदराबाद व सिकंदराबाद विभागातून नांदेड रेल्वे विभागात समाविष्ट करण्याचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे प्रस्ताव मांडण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाहीचे आश्वासन दिले. या पुढाकारामुळे मराठवाडा, विशेषतः नांदेड परिसरात रेल्वे जाळ्याचा विस्तार आणि प्रवासी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS