Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हार शिवारात वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांची सुटका; मालक व व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा

देवळाली प्रवरा : नगर-मनमाड रोडवरील कोल्हार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन प

पोलीस ठाण्यांत अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करा : डॉ. अशोक गावित्रे 
राहुरीत अवैध सावकारांवर धाड; सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या पथकाची छापेमारी; कागदपत्रे जप्त
राहुरीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; सात जणांविरुद्ध गुन्हा

देवळाली प्रवरा : नगर-मनमाड रोडवरील कोल्हार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन परप्रांतीय महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक व व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संबंधित हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पथकाने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच एकजण अंधाराचा फायदा घेऊन शेतात पळून गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे चौकशी केली असता पळालेला व्यक्ती हा त्याचा मुलगा असून तो हॉटेलचा व्यवस्थापक असल्याचे समोर आले.

 कारवाईदरम्यान पोलिसांनी एका दलालाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर हॉटेलमधील खोल्यांची तपासणी केली असता दोन महिला आढळून आल्या. त्या हिंदी भाषिक असून परराज्यातील असल्याचे निष्पन्न झाले.

 सदर महिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाकडून त्यांच्याकडून जबरदस्तीने हा व्यवसाय करून घेतला जात होता. ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांपैकी अर्धी रक्कम मालक घेत असल्याचे त्यांनी सांगितले. पैशांचे आमिष दाखवून हा प्रकार घडवून आणला जात असल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

 या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम व मोबाईलसह सुमारे ४८ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वसंत रघुनाथ लोंढे, प्रसाद वसंत लोंढे व हरिश विनायक जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.

COMMENTS