कोपरगाव : राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तातडीने स्थापन करून कार्यरत करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप अनेक ठिकाणी हा कक्ष सुरू झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कक्षामध्ये पत्रकार, महिला प्रतिनिधी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांचा समावेश करून नियमित आढावा बैठका घेण्यात याव्यात. यामुळे परिसरात घडणारे अघोरी प्रकार समोर येऊन त्यांना वेळेत आळा घालता येईल, असे डॉ. गावित्रे यांनी सांगितले. सध्या काही ठिकाणी भोंदू बाबा, ज्योतिषी यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करून आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही डॉ. गावित्रे यांनी केली आहे.

कोपरगाव : राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष तातडीने स्थापन करून कार्यरत करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाने १९ जुलै २०२४ रोजी राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप अनेक ठिकाणी हा कक्ष सुरू झालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या कक्षामध्ये पत्रकार, महिला प्रतिनिधी तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्त्यांचा समावेश करून नियमित आढावा बैठका घेण्यात याव्यात. यामुळे परिसरात घडणारे अघोरी प्रकार समोर येऊन त्यांना वेळेत आळा घालता येईल, असे डॉ. गावित्रे यांनी सांगितले.
सध्या काही ठिकाणी भोंदू बाबा, ज्योतिषी यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकारांना वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करून आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही डॉ. गावित्रे यांनी केली आहे.

COMMENTS