Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रमजान ईदसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी…

नांदेड प्रतिनिधी - रमजान महिन्याचे रोजे समारोपकडे जात आहेत. सर्व मुस्लिम भाविकांमध्ये रमजान ईदची उत्सुकता वाढली आहे. यामुळे बाजारपेठात खरेदीदारां

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात आवक
काँगे्रसच्या शिक्षक विभागाने प्रचारासाठी तयार व्हावे
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास

नांदेड प्रतिनिधी – रमजान महिन्याचे रोजे समारोपकडे जात आहेत. सर्व मुस्लिम भाविकांमध्ये रमजान ईदची उत्सुकता वाढली आहे. यामुळे बाजारपेठात खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. तर इफ्तारसाठी फळ, फळावळ व खमंग खाद्यपदार्थांची दुकानें थाटली गेली आहेत. सायंकाळी रोजेदार भाविकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे.
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याचे 18 उपवास सोमवारी पूर्ण झाले असून अवघ्या दहा बारा दिवसावर रमजान ईद येऊन ठेपली आहे. यामुळे मुस्लिम भाविकात ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठात महिला, युवतींची मोठी गर्दी दिसून येत आहे. मणियार गल्लीतील मीना बाजारात गर्दी वाढली आहे. सकाळी अकरा ते रात्री दहा वाजेपर्यंत बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मीना बाजारात महिला जर्तरीचे तयार कपडे, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद, दिल्ली, पटियाला येथील काशिदाकारीचे शर्ट, सलवार, दुपट्टा, घागरा, प्लाझो, जीन्स टॉपला प्रथम पसंती युवती देत आहेत. तसेच सौंदर्य प्रसाधने, मेहंदी कोन व पावडर आदींचीही खरेदी होत आहे. राजस्थान, हैदराबाद, दिल्ली, बंगळूर, फिरोजाबाद येथील स्टील, काच, लाखेचे व चमकदार रंगीत खड्यांचे बांगड्या, चप्पल, सँडल्स आदींच्या दुकानावर महिला व युवतीची गर्दी दिसून येत आहे. तर मोहम्मद अली रोड, वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर, देगलूर नाका, बर्की चौक, इतवारा, जुना मोंढा आदी बाजारपेठेत पुरुष व युवकांची खरेदी जोमात सुरु आहे. विशेषतः तयार कपड्यांच्या दुकानात जीन्स पॅन्ट, टी शर्ट, कुर्ता कमीज, चुडीदार, पटीयाला सलवार, पठाणी ड्रेस, हाल्फ व फुल्ल हैदराबादी शेरवानी, ब्लेझर्स, जॅकेट, वासकोट अशा ब्रँडेड तयार कपड्यांची पसंती युवकांमध्ये दिसून येत आहे, फूट वेअरमध्ये ब्रँडेड लेदर व चप्पल, बुट्स, सँडल्स, पंजाबी जुती आदीकडे ही युवकांचा कल दिसून येत आहे. दुसरीकडे सायंकाळी रोजा सोडताना इफ्तारसाठी आवश्यक फळं, फळवळ व खमंग खाद्यांची दुकानें ही ठिकठिकाणी थाटण्यात आली आहेत. देगलूर नाका, बर्की चौक, श्रीनगर, नई आबादी, पीरबुर्‍हाण नगर आदी ठिकाणी दिसत आहे. खमंग मिरची भजे, सामोसा कचोरी, पकोडी, बॉम्बे पापडी, चिवडा आदीबरोबरच टरबुज, खरबूज, द्राक्षे, सफारचंद, केळी, आंबे, चिकू, संत्री, मोसंबी, अननस, किवी, स्ट्राबेरी, ड्रॅगन फ्रूट आदी फळे व नारळ पाणी, रुहअफजा, फालुदा, लस्सी, जूस असे शीतपेय आदीची खरेदी विक्री जोरात सुरु आहे. रात्री उशीरा बिर्याणी, कबाब, हैद्राबादी हलीम, हरिस, अरिे्बयन मंदीच्या हॉटेलवर खाव्वय्ये या खाद्यांचा आस्वाद घेत असल्याचे दिसून येत आहे. येत्या ता. 22 एप्रिलला अपेक्षित रमजान ईदच्या तयारीसाठी शहरात व बाजारपेठात व मशिदीजवळील ठेल्यावर ग्राहकांची गर्दी होत असून उत्साहाचे वातावरणात दिसून येत आहे.

COMMENTS