Homeताज्या बातम्या

आकाशवाणी@90 उपक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात  

अहिल्यानगर : आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या वाटचालीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘आकाशवाणी@९०’ उपक्रमांतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि न्यू आर

कर्जत तालुक्यात वादळी पावसाचा तडाखापिकांसह घरांचे मोठे नुकसान; एक गाय दगावली
राजकीय हस्तक्षेपामुळे संगमनेरचा रेल्वे मार्ग बदललामाजी मंत्री थोरात ; वाढत्या हप्तेखोरी व टक्केवारीबाबत चिंता व्यक्त
महिलेस मारहाण केल्याच्या खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता


अहिल्यानगर : आकाशवाणीच्या ९० वर्षांच्या वाटचालीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘आकाशवाणी@९०’ उपक्रमांतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आणि न्यू आर्ट्स, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुदाम बटुळे यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रम प्रमुख मुजम्मिल पटेल यांनी आकाशवाणीने बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये केलेल्या बदलांची माहिती दिली. समाजमाध्यमे, भ्रमणध्वनीवरील अनुप्रयोग, ध्वनिमुद्रित कार्यक्रम तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे आकाशवाणी तरुण पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे, डॉ. बापू चंदनशिवे, प्रा. अभिजित गजभिये आणि प्रा. श्वेता बंगाळ उपस्थित होते. प्रा. गिऱ्हे यांनी आकाशवाणी आणि भारतीय समाज यांच्यातील गेल्या नऊ दशकांतील जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख करून आकाशवाणीच्या योगदानाचा गौरव केला.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकाशवाणीच्या वतीने स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल सातपुते, वृषाली घनवट, भारती कुलकर्णी, शीतल ठोंबरे आणि प्राची वाडेकर यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS