महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामार्गावर तरुणाच्या दुचाकीने घेतला पेट

दृश्य पाहून मुख्यमंत्री भरपावसात गाडीतून उतरले

विलेपार्ले प्रतिनिधी : धावत्या दुचाकीने किंवा कारने पेट घेतल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच काहीशी घटना विलेपार्ले इथे पाहायला मिळाली. इथे एक

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
सीमावाद प्रश्‍न चिघळणार  !
कसं काय पाटील बरं हाय का ? काल दिल्लीत झालं ते खर हाय का ?

विलेपार्ले प्रतिनिधी : धावत्या दुचाकीने किंवा कारने पेट घेतल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच काहीशी घटना विलेपार्ले इथे पाहायला मिळाली. इथे एका गाडीने अचानक पेट घेतला. मात्र, या घटनेची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde) यांनी घेतली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीला अचानक आग लागली. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना ज्याठिकाणी घडली, त्याच रस्त्याने मुख्यमंत्री प्रवास करत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून मुंबईला येताना विमानतळावरून घरी निघाले होते. यावेळी त्यांना एका तरुणाच्या गाडीने पेट घेतल्याचं दिसलं. महामार्गावरील हे दृश्य पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली गाडी थांबवली आणि भरपावसात ते खाली उतरले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तरुणाला त्याचं नाव आणि पत्ता विचारला. पुढे तरुणाला धीर देत मुख्यमंत्री म्हणाले, की जीव वाचला हे महत्त्वाचं आहे, गाडी आपण दुसरी घेऊ. काळजी करू नकोस, असं मुख्यमंत्री म्हणाले.

COMMENTS