Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री संत गोरोबाकाका सभागृहासाठी निधी द्या; कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाची आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडे मागणी

मुदखेड : मुदखेड शहरात श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या नावाने सुसज्ज व भव्य सभागृह उभारण्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी म

प्रणिता देवरे प्रदेश पातळीवर भाजपात सक्रिय ?
भूमी अभिलेख कार्यालयावरून श्रेयाची लढाई; शांतपणे डाव साधला खा.चव्हाण यांनी
भाजपाचे मनपातील स्वीकृत सदस्य पक्ष कार्यक्रमापासून चार हात लांब; भाजप संघटनेत नाराजीचा सूर

मुदखेड : मुदखेड शहरात श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या नावाने सुसज्ज व भव्य सभागृह उभारण्यासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कुंभार समाजाच्या शिष्टमंडळाने भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. समाजाच्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची नितांत गरज असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
कुंभार समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुदखेड शहर व परिसरात विविध समाजोपयोगी कार्यक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, समाज बैठका तसेच गोरगरीब नागरिकांच्या शुभकार्यांसाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या नावाने आधुनिक सुविधांनी युक्त सभागृह उभारण्यात आल्यास समाजासह सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. शिष्टमंडळाने पुढे सांगितले की, श्री. संत गोरोबाकाका हे वारकरी संप्रदायातील महान संत असून त्यांनी समाजात समता, श्रमसंस्कार आणि भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या नावाने सभागृह उभारल्यास सामाजिक एकात्मतेलाही बळ मिळेल. तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होईल. शहराच्या विकासाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत समाज बांधवांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्ष प्रतिनिधी माधव पाटील कदम, माजी सरपंच मारुती जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष राम आबादार यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. शिष्टमंडळाने सभागृहासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यासह शासन स्तरावर निधी मंजूर करण्याची मागणी आमदारांकडे केली. या निवेदनावर सुरेश तेलंगे, माजी सैनिक चंद्रकांत तेलंगे, शाम शिरोळे, पप्पू तेलंगे, दशरथ तेलंगे, पुरभाजी तेलंगे, गंगाधर तेलंगे, संतोष राजारपल्लू, माधव तेलंगे, शिवराज तेलंगे आदींसह अनेक कुंभार समाज बांधवांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, आमदार श्रीजया चव्हाण यांनी शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल तसेच सभागृहासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे कुंभार समाज बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS