Homeताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी मंगळवारी पारनेर तहसीलवर मोर्चाखा. लंके यांच्या उपस्थितीत बैठक ; शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग

पारनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या २३ जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आह

’ड-ऑन कव्हर’ पुन्हा लागू करण्याबाबत सरकारच्या हालचालीखा.बजरंग सोनवणे यांच्या लोकसभेतील प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे स्पष्टीकरण, ’ड-ऑन कव्हर’ लागू करण्यासाठी खा.सोनवणेंचा पाठपुरावा
श्रीगोंदा-कर्जतमध्ये मुसळधार पाऊस शेती, फळबागा, घरांचे नुकसान
पुण्यात वादळी पावसाचा कहर; गारपिटीने पिकांचे नुकसान, वृक्ष कोसळून महिलेचा मृत्यू



पारनेर : शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या २३ जून रोजी पारनेर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी खा.नीलेश लंके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीस तालुक्यातील शेतकरी, अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना ( उबाठा ) , भूमिपुत्र शेतकरी संघटना, शिवबा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, संभाजी ब्रिग्रेड, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या पक्ष तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी राज्यातील शेतकरी सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती, वाढता उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळत नसलेला हमीभाव आणि वाढती कर्जबाजारीपणाची समस्या यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. त्यामुळे शासनाने कोणत्याही अटी-शर्ती न लावता सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी बैठकीत करण्यात आली.
 खासदार नीलेश लंके यांनी यावेळी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 २३ जून रोजी होणारा जनआक्रोश मोर्चा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व करण्याचे आवाहनही खासदार लंके यांनी केले. तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने शेतकरी, युवक, महिला आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

COMMENTS