Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवेकबुद्धी जागरूक ठेवून सोशल मीडियाचा वापर करा -पोलीस अधीक्षक राकेश ओला

पाथर्डी प्रतिनिधी - आगामी येणाऱ्या गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील समाज बांधवाच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्या

अवघ्या 10 मिनिटांत घर बसल्या बनवा पॅन कार्ड | पहा ‘सकाळच्या बातम्या’ | Lok News24
माणुसकी आणि कार्यावर ठरते श्रीमंती – पारस महाराज मुथा
कुंटनखान्यावर पोलिसांचा छापा…कर्डीले बाप- लेकास अटक LokNews24

पाथर्डी प्रतिनिधी – आगामी येणाऱ्या गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील समाज बांधवाच्या समस्या आणि सूचना जाणून घेण्यासाठी तसेच प्रशासनाकडून सणासाठी लागू केलेल्या नियमांची माहिती देण्यासाठी आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे,पोलीस अधिक्षक राकेश ओला,पाथर्डी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे,प्रांत अधिकारी प्रसाद मते,तहसीलदार शाम वाडकर,पोलीस निरीक्षक संतोष मुटकूळे, मुख्याधिकारी संतोष लांडगे,महावितरणचे शहर अभियंता मयूर जाधव,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पाथर्डी पोलीस ठाण्यात शांतता कमिटी सदस्यांची बैठक पार पडली. यावेळी उपस्थितांनी अतिक्रमण,बस स्थानकावरील चोऱ्या,छेडछाड,व्यावसायिकासाठी पर्यायी जागा,पालिकेकडून बसवण्यात आलेले बंद पडलेले सीसीटीव्ही,गणेश विसर्जन मिरवणुकी मार्गावरील खड्डे,समाज माध्यमातून होणारे तेढ या प्रश्नावर लक्ष वेधत यावर उपयोजना करण्याची मागणी केली.

यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले की,सोशल मीडियाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून त्याचा वापर करताना आपण जागरूक असणे गरजेचे आहे.कोणत्याही माहितीला शेअर करताना किंवा त्याबद्दल प्रतिक्रिया देताना त्याची सहनिशा करावी.अतिक्रमण विषय प्रत्येक शहरात असून त्यासाठी नागरिकांनी स्वतः जबाबदारी उचलत  आपल्यामुळे रहदारीस अडथाळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच अतिक्रमण करून पैसे मागणाऱ्या वर गुन्हा नोंदवला जाईल.तालुक्यात काही संशयास्पद गोष्टी आणि टवाळखोराची माहिती पोलिसांना द्यावी.यावेळी त्यांनी पाथर्डीतील जनतेने एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आभार मानले.

                    यावेळी संतोष जिरेसाळ,अशोक गर्जे,माणिक खेडकर,विष्णू ढाकणे,नागनाथ गर्जे,एलियास शेख,लक्ष्मण डांगे,अजय भंडारी,हुमायुन आतार,वैभव शेवाळे आदी जणांनी मत व्यक्त केले.तर यावेळी नंदकुमार शेळके,शिवशंकर राजळे,बंडू बोरुडे, प्रशांत शेळके,महेश बोरुडे,आदी जणांसह तालुक्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठक यशस्वी होण्यासाठी पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, सचिन लिमकर,नितीन दराडे,भगवान सानप,देविदास तांदळे,विजय काळोखे आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

प्रशासनाने येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल राखत योग्य त्या उपाययोजना कराव्या.तसेच नागरिकांनी ही पोलिसांना सहकार्य करत सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी; आमदार मोनिका राजळे

कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही पोलिसांची असली तरी पादाधिकाऱ्यांनी सावध राहत  सर्व गोष्टींवर लक्ष ठेवत जिथे पोलिसांना गरज असेल तिथे मदत करावी; प्रताप ढाकणे

COMMENTS