Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरमध्ये प्रामाणिकपणाचा सुवर्णमूल्य दाखला!; महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी परत केली ग्राहकाची सोन्याची अंगठी

बेलापूर : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या काळातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा दिलासा देणारी घटना बेलापूर येथे घडली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाची चुकून राहिलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.  बेलापूर येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा हे नेहमीप्रमाणे बँकेत गेले होते. लॉकरमध्ये काही वस्तू ठेवत असताना त्यांच्या हातून सोन्याची अंगठी खाली पडली. ही बाब त्यांच्या लक्षात न आल्याने ते काम आटोपून निघून गेले.  दरम्यान, दुपारच्या सुमारास बँकेतील कर्मचारी अजय डमाळे यांना लॉकरजवळ ती अंगठी आढळली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती शाखाधिकारी राजेश परदेशी यांच्याकडे जमा केली. यानंतर शाखाधिकारी परदेशी यांनी दिवसभरात लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांची सविस्तर माहिती घेतली आणि ती अंगठी प्रशांत लड्डा यांची असल्याचे निष्पन्न झाले. प्रशांत लड्डा हे त्या वेळी बाहेरगावी असल्याचे समजताच शाखाधिकारी परदेशी यांनी त्यांच्याशी तातडीने संपर्क साधला. विशेष म्हणजे, बँकेला सुट्टी असतानाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ काढून लड्डा यांना बोलावून घेतले आणि त्यांची अंगठी सुरक्षितपणे परत केली. अंगठी परत मिळाल्यानंतर लड्डा कुटुंबियांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद शेठ लड्डा, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, तसेच गावातील व्यापारी, पत्रकार यांच्या उपस्थितीत अजय डमाळे, शाखाधिकारी राजेश परदेशी व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर, देविदास देसाई, दिलीप दायमा, रामविलास झंवर, गणेश लड्डा, सचिन नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

वाळणाऱ्या झाडांना ग्रामस्थांकडून ‘जीवदान’ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांचा पुढाकार; सार्वजनिक बांधकामविरुद्ध संताप
भारतीय पद्धतीच्या लग्नाच्या ओढीने परदेशी पाहुणे थेट इंग्लंडहून बेलापूरला !
जलव्यवस्थापन पंधरवाड्यात कालव्यांचे नुतनीकरण करावे : खंडागळे

बेलापूर : आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी वाटणाऱ्या काळातही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा दिलासा देणारी घटना बेलापूर येथे घडली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाची चुकून राहिलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे परत करत समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

 बेलापूर येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लड्डा हे नेहमीप्रमाणे बँकेत गेले होते. लॉकरमध्ये काही वस्तू ठेवत असताना त्यांच्या हातून सोन्याची अंगठी खाली पडली. ही बाब त्यांच्या लक्षात न आल्याने ते काम आटोपून निघून गेले.

 दरम्यान, दुपारच्या सुमारास बँकेतील कर्मचारी अजय डमाळे यांना लॉकरजवळ ती अंगठी आढळली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ती शाखाधिकारी राजेश परदेशी यांच्याकडे जमा केली. यानंतर शाखाधिकारी परदेशी यांनी दिवसभरात लॉकर वापरणाऱ्या ग्राहकांची सविस्तर माहिती घेतली आणि ती अंगठी प्रशांत लड्डा यांची असल्याचे निष्पन्न झाले.

प्रशांत लड्डा हे त्या वेळी बाहेरगावी असल्याचे समजताच शाखाधिकारी परदेशी यांनी त्यांच्याशी तातडीने संपर्क साधला. विशेष म्हणजे, बँकेला सुट्टी असतानाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळ काढून लड्डा यांना बोलावून घेतले आणि त्यांची अंगठी सुरक्षितपणे परत केली.

अंगठी परत मिळाल्यानंतर लड्डा कुटुंबियांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद शेठ लड्डा, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, तसेच गावातील व्यापारी, पत्रकार यांच्या उपस्थितीत अजय डमाळे, शाखाधिकारी राजेश परदेशी व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जेष्ठ पत्रकार मारुतराव राशिनकर, देविदास देसाई, दिलीप दायमा, रामविलास झंवर, गणेश लड्डा, सचिन नगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS