Homeताज्या बातम्यादेश

अदानी प्रकरणी सरकार गप्प का ?

काँगे्रस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँगे्रस आक्रमक झाली असून, सोमवारी विरोधकांनी काळे कपडे घालून सरक

Aurangabad : अधिकाऱ्यांना काळे फासून पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने उभा करू | LOKNews24
राहुरी कृषी विद्यापीठाच्या हळद बियाण्याची छत्तीसगडला भुरळ ः कुलगुरू डॉ. पाटील
बेलापूर येथे राहुरी पोलिसांचा रात्रीस खेळ चाले l पहा LokNews24 —————

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँगे्रस आक्रमक झाली असून, सोमवारी विरोधकांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षाच्या तमाम नेत्यांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला आहे. यावेळी बोलतांना काँगे्रस नेते खरगे म्हणाले की, अदानी प्रकरणावर सरकार गप्प का आहे, अदानी यांनी बेकायदेशीरपणे पैसे कमवले. तुम्ही जेपीसी स्थापन करायला का घाबरता असा सवाल केला.
अदानी प्रकरणावर पुन्हा बोलावलेली संसदेची दोन्ही सभागृहे राहूल गांधींच्या अपात्रतेवर सुरू असलेल्या गदारोळात काही मिनिटांतच तहकूब करण्यात आली. खरगे  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही संपवत आहेत, हे आम्हाला दाखवायचे आहे त्यासाठी आम्ही सर्वजण काळ्या कपड्यात आलो आहोत. भाजपने आधी स्वायत्त संस्था संपवल्या. त्यानंतर निवडणुका जिंकलेल्यांना धमकावून अनेक राज्यामध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले. पण जे झुकले नाहीत त्यांना वाकवण्यासाठी त्यांनी ईडी, सीबीआयचा वापर केला. असा आरोप खरगे यांनी केला. तसेच राहूल गांधींना ज्या ‘विजेच्या गतीने’ अपात्र ठरवले होते तो दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. पण आम्ही मागे हटणार नाही. अदानी प्रकरणाच्या संयुक्त संसदीय चौकशीच्या (जेपीसी) मागणीवर त्यांनी यावेळी जोर दिला.
दरम्यान, विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा 4 आणि राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, या अगोदर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यालयात पक्षाची रणनीती आखली. या बैठकीमध्ये राहुल गांधी यांच्यावरील तत्पूर्वी आज, काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यालयात विरोधी पक्षांची एक प्रमुख रणनीती बैठक झाली, ज्यामध्ये टीएमसीचे प्रतिनिधित्व प्रसून बॅनर्जी आणि जवाहर सरकार यांनी केले. या बैठकीत राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवण्याबाबत विरोधकांच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सभेत राहुल गांधींच्या अपात्रतेच्या निषेधार्थ काँग्रेस खासदारांनी काळे कपडे परिधान केले होते. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती, तेलंगणातील काँग्रेसचे प्रतिस्पर्धी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देखील काळे कपडे परिधान करून निषेधात सामील झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. संसदेच्या अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे आणि विरोधकांनी अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी केलीय तर सत्ताधार्‍यांनी राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणाबद्दल माफी मागावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
काळे कपडे घालून केला सरकारचा निषेध – काँगे्रसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून, सोमवारी काँगे्रससह इतर पक्षाच्या विरोधी खासदारांनी संसदेत प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षाच्या तमाम नेत्यांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला आहे. सोनिया गांधी यांनीही या आंदोलनाला साथ दिली. काळ्या बॉर्डरची साडी नेसून त्या संसदेत आल्या. विरोधकांच्या गोंधळानंतर संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.  

COMMENTS