Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधी पक्षनेतेपद जितेंद्र आव्हाडांकडे

मुंबई/प्रतिनिधी ः मुख्य प्रतोद पद आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवारांसोबत

खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात ;
देश सुरक्षा आणि हनी ट्रॅप
सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी

मुंबई/प्रतिनिधी ः मुख्य प्रतोद पद आणि विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आमदार जितेंद्र आव्हाडांवर सोपवण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड अजित पवारांसोबत गेले नाहीत. ते अजूनही आमच्यासोबत आहेत त्यामुळे नवे विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड असतील, असे शरद पवारांनी जाहीर केले. यानंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे आहे याबद्दल जितेंद्र आव्हाडांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, सध्या राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, आणि जयंत पाटलांनी माझी प्रतोद आणि विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती केली आहे. त्यामुळे मी जो व्हिप काढेल तो त्यांना लागू होईल असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधीपक्षनेतेपद सोपवले आहे.

माझा व्हीप सर्वांना लागू होईल – पक्षाचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझी निवड प्रतोद आणि विरोधीपक्षनेतेपदी निवड केली आहे. मी जे व्हीप काढेल ते त्यांना लागू होईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. 25-25 वर्ष मंत्रिपदे भोगली. ज्या नेत्याने पराकाष्ठ केली ते पद तुम्हाला दिली. या माणसाला या वयात ज्याचा अखेरचा काळ आहे. त्या बापाला अश्या परिस्थितीमध्ये आणणे हे माणुसकीला पटणार नाही, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. मी मेलो तरी शरद पवार यांना सोडणार नाही, असेही आव्हाड म्हणाले.

COMMENTS