माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन

राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल
पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल
विजेच्या धक्क्याने तरूण उद्योजकाचा मृत्यू

चंद्रपूर : राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे नागपुरात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. करोनाबाधीत झाल्याने त्यांच्यावर नागपुरातील खाजगी रुग्णालयात उपचार केले जात होते. मात्र त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.

संजय देवतळे यांच्याकडे अगदी वारसाहक्काने राजकारण चालत आले. माजी मंत्री दिवंगत दादासाहेब देवतळे यांचे पुतणे असलेले संजय देवतळे चार वेळा वरोरा – भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्या मतदारसंघावर हक्क प्रस्थापित केला. संजय देवतळे यांचा हा गड राहिला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहाण यांच्या मंत्रीमंडळात त्यांना पर्यावरण, सांस्कुतिक खातेची जबाबदारी मिळाली. शिवसेनेतून नुकतीच विधानसभा लढविलेल्या संजय देवतळे यांनी वरोरा येथे त्यांच्या राहत्या घरी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुन:श्च भाजपात केला होता.

शांत, सुस्वपभावी, सुसंस्कृत नेता हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार

राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्या निधनाने शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त, केली आहे. संजय देवतळे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असुन या बातमीवर विश्वासच बसत नाही. विधानसभा सदस्य म्हणुन त्यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्न् विधानसभाग़हात मांडणारा अभ्यासु लोकप्रतिनिधी म्हणुन त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणुन त्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्हयाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या दु’:खातुन सावरण्याचे बळ देवो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS