Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 समाजरक्षक पुरस्काराने प्रसाद सुरंजे  सन्मानित

शिर्डी/प्रतिनिधी ः समाजकार्यात नेहमी अगे्रसर असणार्‍या प्रसाद सुरंजे यांना समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील चर्मकार

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविणार : महसूल मंत्री बावनकुळे
प्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’ LokNews24
 कोपरगावात कोरडा दुष्काळ जाहीर करा ः आ. आशुतोष काळेंची शासनाकडे मागणी

शिर्डी/प्रतिनिधी ः समाजकार्यात नेहमी अगे्रसर असणार्‍या प्रसाद सुरंजे यांना समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अहमदनगर जिल्ह्यातील चर्मकार विकास संघाच्या वतीने चर्मकार समाजातील 10 वी व  12 वीच्या विद्यार्थीचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्ह्यामधील समाजकार्यामध्ये जे युवक, युवती,महिला,पुरुष असे अग्रेसर असणारे व्यक्तिंचा सत्कार आमदार संग्राम (भैय्या )जगताप, संदीप (दादा )घनदाट व संजय खामकर यांचा  हस्ते, करण्यात आला.यामध्ये शिर्डी येथील प्रसाद बाळु सुरंजे यांची निवड करण्यात आली. सुरंजे हे नेहमी शिर्डी शहरामध्ये सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात शिर्डीमध्ये येणार्‍या भाविकांना प्रसाद वाटप करणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करणे, गरजवंतांना मदत सहकार्य करणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे. त्यांच्या कार्याचे दखल घेऊन चर्मकार विकास संघाने त्यांची निवड करून प्रसाद सुरंजे यांना (समाजरक्षक) समाज सेवक म्हनूण गुणगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिर्डी शहरातील मित्र परिवाराकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

COMMENTS