Homeताज्या बातम्या

शारदा कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात; शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींचा सत्कार

राहाता: शारदा कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून गुरू-शिष्य परंपरेचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थ

शेवगावमध्ये स्मार्ट मिटर विरोधात ‘वंचित’चे ठिय्या आंदोलन; महावितरण कार्यालयासमोर निदर्शने
रुग्णालयात तोडफोड; तिघांविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सौ. के.एस.के. महाविद्यालयात विद्यार्थी संवाद व प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात संपन्न

राहाता: शारदा कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करून गुरू-शिष्य परंपरेचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा शैक्षणिक संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना व्यासपौर्णिमेचे महत्त्व तसेच भारतीय संस्कृतीतील गुरूंचे अढळ स्थान विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आर. व्ही. साळवे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करत विद्यार्थिनींना शिक्षणासोबतच संस्कारांचे मोल पटवून दिले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी ‘ब’ आणि ‘क’च्या विद्यार्थिनींनी केले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवर व शिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थिनींनी गुरूंच्या महान कार्याबद्दल आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी आणि गुरूंबद्दलची कृतज्ञतेची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका सुनीता सातव, निलोफर पठाण, प्रणव चंदने, बेबी कारभारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थिनींना पुढील स्पर्धा परीक्षांसाठी मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विद्यार्थिनी ईश्वरी गडगे हिने मानले.

COMMENTS