Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अशोक खरातांचा विश्‍वासू जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू

मुंबई : अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला

नवविवाहीत दाम्पत्यासह चौघांचा मृत्यू
वसमत पं. स.चे माजी सभापती प्रकाश ढोणे यांचा नांदेडजवळ अपघाती मृत्यू
आजरा येथे भिंत कोसळून प्राध्यापिका व विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबई : अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती व्यक्त केली होती की, अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. खरात प्रकरणातील सत्य बाहेर येऊ नये असे काही लोकांना वाटत आहे का? असा सवाल ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला.

हा अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. अशोक खरात याचे कारनामे पुढे येऊ नयेत आणि कोणी अडचणीत येऊ नये म्हणून हा अपघात कोणी घडवून आणला का? असा सवाल करत त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS