Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘राजकीय’ राडा; विजय पाटकरांचा थेट मंत्र्यांच्या OSD वर खळबळजनक आरोप, क्रांती रेडकर-निशिगंधा वाड यांचे फॉर्म रोखल्याचा दावा!

मुंबई : तब्बल १० वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आता प्रचंड राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय

अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त मंत्री उदय सामंत यांची कार्यवाही ; प्रभारी म्हणून जिल्हाप्रमुखांकडे जबाबदारी 
बीडमध्ये पंचतारांकित एमआयडीसीसाठी हालचालींना वेग; पुढील आठवड्यात मंत्रालयात महत्त्वाची बैठक
अहिल्यानगर जिल्हा शिवसेना कार्यकारणी बरखास्त; आगामी महिनाभरात नव्या दमाची फळी सज्ज होणार!
मंत्र्याकडून दबाव, मला अर्जही.., चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीबद्दल विजय  पाटकर यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Vijay patkar allegations on akhil  bharatiya chitrapat ...

मुंबई : तब्बल १० वर्षांनंतर होत असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत आता प्रचंड राजकीय भूकंप झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि थेट एका बड्या मंत्र्यांच्या ओएसडीवर (OSD) गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. “राजकारण करून माझा, क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांचा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही”, असा खळबळजनक दावा पाटकरांनी केलाय.
मराठी चित्रपट महामंडळाच्या १७ जागांसाठी सध्या कोल्हापुरात निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. मात्र, ही निवडणूक आता कलाकारांमधील राहिली नसून यात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा आरोप विजय पाटकर यांनी केलाय. पाटकर म्हणाले की, “मी पॅनेल उभा करेल या भीतीने काही लोकांनी राजकारण करून माझा अर्ज भरू दिला नाही.” एवढंच नाही तर क्रांती रेडकर आणि निशिगंधा वाड यांच्याही अर्जाबाबत हाच राजकीय खेळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना विजय पाटकरांचा राग अनावर झाला. त्यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. “राजेभोसले यांना लाज वाटायला पाहिजे. मागील १० वर्षांत त्यांनी महामंडळाचं अक्षरश: थडगं करून ठेवलंय. ७ महिने कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही आणि उलट मला फोन करून त्यांच्या पॅनलमधून उभे राहण्याची ऑफर देतात”, अशा शब्दांत पाटकरांनी आपला संताप व्यक्त केला.
या सगळ्यात सर्वात मोठा आरोप विजय पाटकरांनी थेट सरकारमधील एका मंत्र्यावर आणि त्यांच्या ओएसडीवर केला आहे. पाटकरांच्या मते, “एका बड्या मंत्र्यांचा ओएसडी मागच्या चार दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून बसलाय आणि मतदारांवर, कलाकारांवर दबाव आणत आहे. या निवडणुकीत उदय सामंत यांचा राजकीय हस्तक्षेप आहे का, हे मला माहीत नाही; पण मंत्र्यांच्या ओएसडीला चित्रपट महामंडळात लुडबुड करायची काय गरज?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
एकीकडे वर्षा उसगांवकर आणि नीलम शिर्के यांच्यात लढत रंगत असताना, दुसरीकडे उमेदवारी अर्ज डावलल्यामुळे विजय पाटकर आता आक्रमक झाले आहेत. ४० वर्ष इंडस्ट्रीत असणाऱ्या कलाकारांना बाजूला सारून राजकीय नेत्यांची चाललेली ही खेळी आता संपूर्ण चित्रपटसृष्टीत चर्चेचा आणि वादाचा विषय बनली आहे. यावर आता महामंडळ काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS