Homeताज्या बातम्या

अनुदानित शिक्षकांच्या थकीत वेतनाची तातडीने अदा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

बीड जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकीत वेतन देयके तातडीने नि

पत्रकारांना शिवीगाळ व धमकी प्रकरणी खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन – नितीन सोनवणेपत्रकारांवर हात उठवला तर पँथर स्टाईल उत्तर देऊ – ऑल इंडिया पँथर सेनेचा इशारा
आरिश मस्जिद परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था; नागरिकांचा तीव्र संतापज्या प्रभागातून आमदार, खासदार आणि नगराध्यक्षांना कायम आघाडी मिळते, त्याच परिसरातील नागरिक चिखलातून चालण्यास मजबूर
क्युरिंगचा ‘फार्स’ की जनतेचा ‘छळ’?किनवटच्या भुयारी पुलाखालील रस्त्यावरून नागरिकांचा पारा चढला; आंदोलनाचा इशारा!



बीड जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकीत वेतन देयके तातडीने निकाली काढावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड् टिचर्स असोसिएशन (मुप्टा )बीड जिल्ह्याच्या वतीने वेतन व भविष्य निर्वाह निधी (भ.नि.नि.) पथक कार्यालयाचे अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांची वरिष्ठ वेतनश्रेणी फरक देयके, निवडश्रेणी फरक देयके, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, रजा कालावधीतील देयके, सेवानिवृत्ती देयके तसेच इतर ऑनलाइन व ऑफलाइन स्वरूपातील अनेक देयके गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित कर्मचार्‍यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, ही सर्व थकीत देयके तातडीने मंजूर करून अदा करावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे. यावेळी मुप्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरदराव मगर, जिल्हा सचिव प्रा. शशिकांत जावळे, ज्युनिअर विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण घोलप, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार तरकसे, मुख्याध्यापक डॉ. संजय मुरुमकर, शेख मसरूर अनवर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. निवेदनाची दखल घेऊन प्रलंबित वेतन देयकांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा नंतर यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  बीड जिल्हा मुप्टा शिक्षक संघटनेने दिला आहे.

COMMENTS