Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पाकिस्तान क्वेटामध्ये जाफर एक्स्प्रेसवर आत्मघाती हल्ला; भीषण स्फोटात २६ प्रवाशांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी!

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण बातमी समोर येत आहे. क्वेटा येथील चमन गेट रेल्वे रुळाजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने

इराणने अणुकार्यक्रम थांबवावा अन्यथा करार अशक्य; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ठाम भूमिका
जपानमध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप
आखातात युद्धाचा भडका! इराणकडून भारतीय खलाशी असलेल्या टँकरवर गोळीबार
Pakistan: Blast targeting train kills at least 20 in Balochistan - BBC News

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण बातमी समोर येत आहे. क्वेटा येथील चमन गेट रेल्वे रुळाजवळ एका आत्मघाती हल्लेखोराने चालत्या ‘जाफर एक्स्प्रेस’ला लक्ष्य केले आहे. या भीषण बॉम्बस्फोटात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून ७० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जाफर एक्स्प्रेस जेव्हा क्वेटा कॅन्टच्या दिशेने जात होती, त्याच वेळी हा आत्मघाती हल्ला झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि संपूर्ण परिसरात एकच घबराट पसरली. स्फोटानंतर रेल्वे रुळांजवळ भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.
स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की, जवळपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. सध्या सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर सील केला असून हाय अलर्ट जारी केला आहे. बलुचिस्तान सरकारचे गृह व्यवहार विशेष सहाय्यक बाबर युसुफझाई यांनी या घटनेच्या सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची अधिकृत जबाबदारी स्वीकारलेली नाही, परंतु पोलीस याकडे दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहत आहेत.
विशेष म्हणजे, जाफर एक्स्प्रेस दहशतवाद्यांच्या रडारवर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. ही ट्रेन बलुचिस्तानची राजधानी क्वेटाला पाकिस्तानच्या इतर प्रमुख शहरांशी जोडते. हा मार्ग अत्यंत संवेदनशील असून या भागात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ म्हणजेच BLA चे मोठे वर्चस्व आहे. गेल्या वर्षीही या संघटनेने जाफर एक्सप्रेसचे अपहरण करून २१४ प्रवाशांना ओलीस ठेवले होते.
या ताज्या आत्मघाती हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, बलुचिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जखमींवर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

COMMENTS