Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजकीय नेत्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत : मंत्री छगन भुजबळ

मुंबई : तथाकथित भोंदूगिरीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संयमित पण

हिंद महासागरात तणावाची ठिणगी; इराणचा अमेरिकेच्या तळावर हल्ला
राजकीय आक्रमकता अंगलट!
रुपयाची ऐतिहासिक नीचांकी घसरणऊर्जा संकट गडद, परकीय भांडवलांच्या माघारीमुळे रुपया 93.24 वर

मुंबई : तथाकथित भोंदूगिरीच्या प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संयमित पण ठाम भूमिका मांडली आहे. संबंधित प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू असून, त्यातून वस्तुस्थिती समोर येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. त्याचवेळी समाजातील अंधश्रद्धा आणि सार्वजनिक जीवनातील जबाबदारी यांचा संबंध अधोरेखित करत, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी स्वतःच्या वर्तनाच्या मर्यादा स्पष्ट ठेवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
भोंदूगिरीसारख्या प्रकारांमुळे समाजात चुकीचे संदेश जातात, असे नमूद करत भुजबळ म्हणाले की, लोकांनी विवेकबुद्धी जागृत ठेवून अशा प्रवृत्तींना बळी पडू नये. अध्यात्म, साधना किंवा सामाजिक सेवा यांचा मार्ग वेगळा असतो; परंतु काही अपप्रवृत्तीमुळे या क्षेत्राची प्रतिमा मलिन होते. परिणामी, खर्‍या अर्थाने समाजकार्य करणार्‍यांनाही संशयाच्या भोवर्‍यात ओढले जाते. या प्रकरणात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे पुढे येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी स्पष्ट केले की, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या प्रत्येक कृतीचा समाजावर परिणाम होत असतो. आपण नेते म्हणून कुठे जातो, कोणाशी संबंध ठेवतो, यावरून सामान्य माणसात विश्‍वास निर्माण होतो किंवा भ्रम पसरतो, असे ते म्हणाले. त्यामुळे अशा संवेदनशील बाबींमध्ये अधिक सजगता आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या रुपाली चाकणकर यांच्याबाबत बोलताना भुजबळ यांनी घाईघाईने निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. कोणत्याही आरोपामागील तथ्य तपासण्यासाठी वेळ लागतो; अन्यथा अन्याय होण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. शासनस्तरावर महत्त्वाच्या पदांबाबत निर्णय घेताना वरिष्ठ पातळीवर चर्चा होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, पक्षीय जबाबदार्‍यांबाबतचा निर्णय हा संबंधित पक्ष नेतृत्वाच्या अखत्यारित येतो, असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, अशा प्रकरणांत वस्तुस्थिती समोर आल्यानंतरच पुढील पावले उचलली जातात. पोलीस यंत्रणा आपले काम करत असून, चौकशीत जे काही सत्य असेल ते उघड होईल, असा पुनरुच्चार भुजबळ यांनी केला. चुकीचे कृत्य सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कारवाई अटळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS