Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजधानी दिल्लीत ईदचा उत्सव; श्रद्धा शांततेचा संदेश

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ईद-उल-फित्रचा सण शनिवारी उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा झाला. पहाटेपासूनच मशिदी परिसरात गर्द

ईद निमित्त मीडियातील गरजवंताना ‘ईद मुबारक किट’ वाटप  राजयोग फाउंडेशन व पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम
राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी ‘कट-कारस्थान; ’आमदार रोहित पवारांचा पटेल आणि तटकरेंवर गंभीर आरोप
रमजान ईद निमित्त तृतीयपंथीयांना ‘रमजान मुबारक किट’ वाटप; राजयोग फाउंडेशन व आश्रय सेवा केंद्राच्या वतीने संवेदनशील उपक्रम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ईद-उल-फित्रचा सण शनिवारी उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा झाला. पहाटेपासूनच मशिदी परिसरात गर्दी उसळली होती. मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून देशाच्या प्रगतीसह जगभरातील शांतता आणि सौहार्दासाठी प्रार्थना केली.
जुन्या दिल्लीतील ऐतिहासिक शाहजहानी जामा मशिदीत मोठ्या संख्येने भाविकांनी एकत्र येत ईदची नमाज अदा केली. मशिदीचे प्रांगण, पायर्‍या आणि आसपासचे रस्ते भाविकांनी भरून गेले होते. नमाजनंतर सर्वांनी विशेष प्रार्थना करत परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. फतेहपुरी मशिदीतही भाविकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. येथे धार्मिक प्रमुखांनी जागतिक स्तरावर वाढत्या अस्थिरतेचा उल्लेख करत शांततेचे आणि परस्पर सौहार्दाचे महत्त्व अधोरेखित केले. देशात स्थैर्य आणि प्रगती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. शाही ईदगाहसह राजधानीतील विविध मशिदींमध्येही मोठ्या प्रमाणावर नमाज अदा करण्यात आली. नमाजासाठी आलेल्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. हजरत निजामुद्दीन औलिया दरगाह तसेच जामिया परिसरातील मशिदींमध्येही भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. यमुना पार भागासह लक्ष्मी नगर, शकरपूर, सीलमपूर, शाहदरा, मुस्तफाबाद, करावल नगर, त्रिलोकपुरी, मयूर विहार, जामिया नगर, बटला हाऊस, बदरपूर, तुघलकाबाद, संगम विहार, मेहरोळी, साकेत, वसंत कुंज आणि वसंत विहार या परिसरांतील मशिदींमध्येही ईदची नमाज श्रद्धेने पार पडली.
दरम्यान, मशिदीबाहेर फुगे, खेळणी आणि विविध वस्तू विकणार्‍या विक्रेत्यांची रेलचेल दिसून आली. लहान मुलांनी आनंदाने खरेदी करत सणाचा उत्साह अधिकच वाढवला. एकमेकांना शुभेच्छा देत आणि गोडधोड वाटत, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा सण राजधानीत सर्वत्र उत्साहात साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS