Homeताज्या बातम्या

पत्रकार विनोद डाकोरे यांना ‘युवा पत्रकार गौरव पुरस्कार’ जाहीर; लोहा शहरासह नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

नांदेड : पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे आणि निर्भीड पत्रकारितेचा ठसा उमटवणारे ’आवाज महारा

तुकाराम मुंडे नांदेडला आल्याच्या अफवेने खळबळ; कारवाईच्या भीतीने शहरातील पानटपऱ्या बंद, गुटखा विक्रेत्यांचा पोबारा
गोदावरी नदीपात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका; २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० रेती माफियांवर गुन्हा
महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नागरिक संतप्त; वारा-पाऊस नसतानाही हणेगाव मध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

नांदेड : पत्रकारिता क्षेत्रात आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे आणि निर्भीड पत्रकारितेचा ठसा उमटवणारे ’आवाज महाराष्ट्राचा २४×७ न्यूज’चे मुख्य संपादक विनोद रोहिदास डाकोरे यांना सन २०२६ चा प्रतिष्ठित ‘युवा पत्रकार गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे लोहा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विनोद डाकोरे यांनी पत्रकारितेत पाऊल ठेवल्यापासून नेहमीच समाजहिताच्या बातम्यांना प्राधान्य दिले आहे. उपेक्षित, वंचित आणि सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करत त्यांनी प्रशासनाला अनेकदा लोकहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय, धाडसी आणि उत्कृष्ट कार्याची दखल प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थान, भास्कर व्यायाम शाळा व क्रीडा मंडळाने घेतली आहे.

संस्थेचे अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून, लवकरच राज्यस्तरीय सोहळ्यात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी विनोद डाकोरे यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS