Homeताज्या बातम्या

पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा; निर्मीड पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माजलगाव: राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पत्रकारांच्या सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणासाठी ठोस उपा

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले पदक; झंडू कुमारने पटकवले कांस्यपदक
पेन्शनधारकांचा रविवारी बाभळेश्वरमध्ये मेळावा; दिल्लीतील धरणे आंदोलनाची आखणार रूपरेषा
शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरमनिमित्त ताजियाची स्थापना; आज विसर्जन तर रविवारी महाप्रसादाचे आयोजन
Devendra Fadnavis says Maharashtra nearing trillion-dollar economy milestone

माजलगाव: राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पत्रकारांच्या सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निर्मीड पत्रकार संघ, बीड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री सचिवालयात सादर करण्यात आले असून त्याची प्रत माहिती व जनसंपर्क विभाग, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, जिल्हाधिकारी बीड आणि जिल्हा माहिती अधिकारी यांनाही पाठविण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील त्रुटी जनतेसमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. ग्रामीण व तालुका स्तरावर कार्यरत पत्रकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेचा आवाज बनून काम करीत असतानाही त्यांना आर्थिक अस्थिरता, आरोग्य सुविधा, विमा संरक्षण, मानधन आणि मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पत्रकारांना सुरक्षित, सन्मानजनक आणि सक्षम वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे संघाने नमूद केले आहे. निवेदनाद्वारे पत्रकार हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी व कठोर अंमलबजावणी करणे, ग्रामीण व छोट्या वृत्तसंस्थांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी विशेष कल्याणकारी व आर्थिक सहाय्य योजना राबविणे, पत्रकारांसाठी आरोग्य विमा, अपघाती विमा आणि कुटुंब सुरक्षा योजना अधिक व्यापक करणे, ज्येष्ठ व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पत्रकारांसाठी पेन्शन व पत्रकार सन्मान योजनांचा विस्तार करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच पत्रकारांवरील खोटे गुन्हे, धमक्या व दबावाच्या घटनांमध्ये तातडीने संरक्षण आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन व पत्रकार सुविधा केंद्र उभारण्यात यावे, पत्रकारांसाठी शासकीय माहिती, प्रशिक्षण, डिजिटल पत्रकारिता व आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, तसेच छोट्या व स्थानिक वृत्तपत्रे, न्यूज पोर्टल आणि डिजिटल माध्यमांना शासकीय जाहिरात धोरणात न्याय्य संधी मिळावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर देवेंद्र ढाका (प्रदेशाध्यक्ष), परमेश्वर साळुंके (जिल्हाध्यक्ष), बाळासाहेब आडागळे (तालुका अध्यक्ष) आणि संतोष रसवे (संपादक) यांच्या स्वाक्षर्‍या असून, पत्रकारांच्या हितासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेत सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा निर्मीड पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.

COMMENTS