Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

क्रेन कोसळून पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

मुंबई : महानगरातील रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणार्‍या दुर्लक्षाचा आणखी एक धक्कादायक प्रकार मानखुर्द येथे उघडकीस आला आहे. सायन

मुंबईत मध्यरात्री थरार! सायन प्रतीक्षा नगर बस डेपोत भीषण आग; दोन बसेस जळून खाक!
भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत 2 तरूणींचा मृत्यू
लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक
बांधकामाचा क्रेन अंगावर धाडकन कोसळला, घरी निघालेल्या पोलीस हवालदारावर  काळाचा घाला, कुटुंबाचा आक्रोश - Marathi News | Mumbai Crane Collapses on  Police Havaldar in ...

मुंबई : महानगरातील रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणार्‍या दुर्लक्षाचा आणखी एक धक्कादायक प्रकार मानखुर्द येथे उघडकीस आला आहे. सायन-पनवेल महामार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान अवजड ड्रिलिंग क्रेन अचानक कोसळून मोटारसायकलस्वार पोलिस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मानखुर्द पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. महानगरपालिकेकडून रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी मोठ्या आकाराच्या ‘एक्साव्हेटर ड्रिलिंग क्रेन’चा वापर केला जात होता. काम सुरू असतानाच क्रेन उभी असलेल्या ठिकाणची जमीन अचानक खचली आणि यंत्राचा तोल जाऊन ती थेट रस्त्यावर कोसळली. त्याच वेळी मोटारसायकलवरून जात असलेले नेहरू नगर पोलिस ठाण्याचे हवालदार संतोष गोपाळ चव्हाण (वय अंदाजे 45) यांच्या अंगावर ही क्रेन पडली. अपघात इतका भीषण होता की, त्यांना बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. प्राथमिक चौकशीत या अपघातामागे सुरक्षेच्या नियमांकडे केलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे संकेत मिळत आहेत. क्रेन उभी करण्यापूर्वी जमिनीची क्षमता तपासण्यात आली नव्हती, तसेच आवश्यक सुरक्षा उपाय-जसे की बॅरिकेडिंग, इशारा फलक किंवा वाहतूक नियंत्रण-पुरेशा प्रमाणात करण्यात आले नव्हते, असे समोर आले आहे. अवजड यंत्रसामग्री हाताळताना आवश्यक प्रशिक्षण आणि देखरेख होती का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर मानखुर्द पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेन चालक आणि कामाशी संबंधित काही कर्मचार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS