Homeताज्या बातम्या

विनापरवाना दारू विक्रीप्रकरणी पोलिसांची कारवाई; कुंटूर येथे ‘राजवाडा हॉटेल’वर धाड, गुन्हा दाखल

नायगाव : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे विनापरवाना देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या राजेश उर्फ जिंतू जयराम झुंजारे याच्याविरुद्ध कुंटूर पोलिस

शनिशिंगणापूरच्या शनेश्वर देवस्थानच्या दानपात्रात महिनाभरात ६४ लाखांचे दान; सोने-चांदीच्या स्वरूपातही लाखो रुपयांची देणगी
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पुण्यात साहाय्यता कक्ष; डॉ. नीलम गोऱ्हे यांची घोषणा
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू थेट शेतकऱ्याच्या शेतात! राऊतवाडीतील ‘कोकण बहाडोली’ जांभूळ बाग ठरतेय अभ्यासाचा विषय

नायगाव : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे विनापरवाना देशी व विदेशी दारूची विक्री करणाऱ्या राजेश उर्फ जिंतू जयराम झुंजारे याच्याविरुद्ध कुंटूर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे कुंटूर व परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरी-नायगाव राज्य महामार्गावरील कुंटूर येथील मुख्य चौकाजवळ असलेल्या ‘राजवाडा हॉटेल’मध्ये खाणावळच्या नावाखाली चोरट्या मार्गाने देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती कुंटूर पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक धाड टाकून हॉटेलची तपासणी केली. तपासणीदरम्यान ‘भिंगरी संत्रा’ या लेबलच्या १८० मिली क्षमतेच्या २८ सीलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची किंमत २ हजार २४६ रुपये असून, हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

याप्रकरणी राजेश उर्फ जिंतू जयराम झुंजारे (रा. कुंटूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की, झुंजारे याच्याविरुद्ध यापूर्वीही विनापरवाना दारू विक्रीप्रकरणी कारवाई झाली होती. मात्र, त्यानंतरही अवैध व्यवसाय सुरूच असल्याचे या नव्या कारवाईतून समोर आले आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर अधिक कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ही कारवाई कुंटूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. वाकदकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार मोहनराव कंधारे व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील हंबर्डे यांनी केली. कुंटूर व परिसरातील अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी अशी धडक मोहीम सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS