Homeताज्या बातम्या

भोकरमध्ये समाजकर्त्याला जीवे मारण्याची धमकी; अज्ञात तिघांविरोधात तक्रार

भोकर : भोकर शहरातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत विठ्ठल विस्तापुरे यांना तीन अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आ

निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल
जयभीमनगरात मोठ्या भावाकडून लहान भावाचा दगडाने ठेचून खून
जयंती मिरवणुकीवरून वाद; तिघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीरमाष्टी येथे घटना; 16 जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह गुन्हा, 11 जण अटकेत
Nearby Police Station in Bhokar, Nanded - Police Helpline Number - Justdial

भोकर : भोकर शहरातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत विठ्ठल विस्तापुरे यांना तीन अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत विस्तापुरे हे आपल्या घरी जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडविले. यावेळी संबंधितांनी, “तू खूप समाजकार्य करतोस. यापुढे आमच्या कामात अडथळा आणलास तर तुला रॉडने मारहाण करू, पाहून घेऊ,” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या धमकीमुळे घाबरलेल्या विस्तापुरे यांनी तेथून तातडीने निघून जात स्वतःचा बचाव केला. त्यानंतर त्यांनी भोकर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संपूर्ण घटनेची माहिती देत लेखी निवेदन सादर केले. तक्रारीमध्ये संबंधित अज्ञात तिघांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे भोकर परिसरात चर्चेला उधाण आले असून समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना धमक्या मिळत असल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पुढील तपास सुरू केला असून संबंधितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

COMMENTS