Homeताज्या बातम्या

मटणानंतर दही खाणे बेतले जीवावर

नाशिक : जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचे जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. रविवारी रात्री मटणाचे जेव

अन्न व औषध प्रशासनाची गुटखा-पानमसाल्यावर धडक कारवाई; सुमारे 9.86 लाखांचा प्रतिबंधित माल  जप्त
मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त
इंदूर नमकीनचा परवाना तत्काळ निलंबित


नाशिक : जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील आखतवाडे गावामध्ये मटणाचे जेवण एका शेतकरी दाम्पत्याच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. रविवारी रात्री मटणाचे जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आखतवाडे गावावर आणि नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे 78 वर्षीय शांताराम ह्याळीज यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

COMMENTS