Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारडा वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

अहमदनगर ः येथील हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा वसतिगृहामध्ये सन 2024-2025 शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसा

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार जाहीर
आखोणी ग्रामस्थांचे कर्जत पंचायत समितीसमोर उपोषण
शेतकर्‍यांची वीज तोडल्यामुळे महावितरणला ठोकले ठाळे

अहमदनगर ः येथील हिंद सेवा मंडळाच्या रामकरण सारडा वसतिगृहामध्ये सन 2024-2025 शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व भटक्या व विमुक्त जाती जमातीच्या विद्यार्थ्यांनी रामकरण सारडा विद्यार्थी गृह सिव्हील हडको, सावेडी रोड, अहमदनगर मोबाईल नंबर-9637790965 या क्रमांकावर अधीक्षक बंडू भोसले यांचेकडे सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत समक्ष संपर्क साधावा. वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीयुक्त प्रशस्त इमारत, जेवणाची व राहण्याची तसेच शालेय गणवेश, शालेय साहित्य व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी गरजू व होत करू विद्यार्थ्यांनी वसतिगृहात त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन चेअरमन शामसुंदर सारडा व सचिव अजित बोरा यांनी केले आहे.

COMMENTS