Homeताज्या बातम्या

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कड्यात शांततापूर्ण निषेध रॅली; पोलिसांना निवेदन

कडा: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्र

तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईची धास्ती; नांदेडच्या बाजारातून सुटे खाद्यतेल गायब, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांचा हिशोब कोण घेणार?
बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती
अकोलेत विद्यार्थ्यांना आरोग्य जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन; पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीवर व्याख्यान

कडा: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कडा व परिसरातील संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी शांततापूर्ण निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीसाठी आयोजकांनी कडा पोलीस चौकीमार्फत आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना परवानगीसाठी निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतल्याच्या घटनेचा निषेध नोंदविणे आणि लोकशाही मार्गाने नागरिकांची भूमिका शांततापूर्ण पद्धतीने मांडणे हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

आयोजकांच्या माहितीनुसार, रॅलीची सुरुवात सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कडा येथून होणार असून बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, ग्रामपंचायत मार्ग आणि मुख्य रस्ता मार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तिचा समारोप होणार आहे.

रॅली पूर्णपणे शांततापूर्ण वातावरणात आणि कायद्याचे पालन करून काढण्यात येईल. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांनी स्वीकारली असून पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व अटी व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या निवेदनावर संदीप जाधव, दीपक गरुड, परमेश्वर घोडके, बबलू आखाडे, कांतीलाल गिर्हे, रहेमान सय्यद, प्रा. राम बोडखे, अमजद शेख, संतोष ससाणे, सुशील जाधव, अमोल घोडके, पप्पू खेत्रे यांच्यासह अनेक संविधानप्रेमी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS