नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे भावठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र (झकउ) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात गावातील एकूण 35 ल

नागरी रुग्णालय अंबाजोगाई येथे भावठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र (झकउ) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बिन टाका शस्त्रक्रिया शिबिरात गावातील एकूण 35 लाभार्थ्यांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी भावठाणा झकउ येथील 25 लाभार्थी याचा सहभाग. हे शिबिर तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडले.
या शिबिरामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बिन टाका (ीींळींलहश्रशीी) पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे रुग्णांना कमी वेदना, कमी रक्तस्त्राव आणि जलद बरे होण्याचा लाभ मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी असे शिबिर मोठा दिलासा देणारे ठरले. शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्जन डॉ. सुमित मसुरे यांनी प्रमुख भूमिका बजावली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज थोरात व डॉ. ऋतुजा जावळे यांनी रुग्णांची तपासणी व उपचार प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. आरोग्य सहाय्यक श्री. संजयकुमार गायके, आरोग्य सहायिका लेमटे सिस्टर व वाघमारे सिस्टर यांनी रुग्णसेवेत सक्रिय सहभाग घेतला. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दिपाली निकुंभ, डॉ. नगमा शेख व डॉ. व्यंकटेश बेंबडे यांनीही शिबिराच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय आरोग्य सेवक सिद्धांत जोगदंड, मस्के एम.बी., दीपक पाचांगे तसेच आरोग्य सेविका खरटमल सिस्टर व चव्हाण सिस्टर यांनी शिबिरासाठी आवश्यक समन्वय साधला. परिचर अनिल जाधव , ड्रायव्हर गणेश कापसे तसेच आशा सेविका प्रिती मस्के यांनी धावडी येथील 6 लाभार्थी यांना प्रवृत्त केलेआशासेविका सुरवसे विजयमाला, होके,सविता शिला जाधव, अनिता सुरवसे, प्रियदर्शनी देवकते, सुरेखा होके व प्रियंका चामनर प्रिती मस्के यांनीही परिश्रम घेतले. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वी ठरले असून लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, भविष्यातही असे शिबिर आयोजित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS