मोबाईल टॉवरची अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रेक्षपण राहणार बंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोबाईल टॉवरची अंतिम सुनावणी होईपर्यंत प्रेक्षपण राहणार बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)-  शहरातील धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असताना महापालिकेत सहाय्यक संचालक नगर

जप्त ट्रॅक्टर सोडण्यासाठी अडवणूक, देहर्‍याच्या युवकाने केली आत्महत्या
महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश ; कृषिपंपाना ८ तास सुरळीत वीजपुरवठा
व्याजापोटी सावकाराने नेल्या शेळ्या: आठवड्यात सावकारीचा तिसरा गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

शहरातील धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवरला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असताना महापालिकेत सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांच्या समोर नुकतीच सुनावणी घेण्यात आली. यामध्ये सदर प्रकरणी अंतिम सुनावणी होईपर्यंत मोबाईल टॉवरचे प्रेक्षपण बंद ठेवण्याचे मोबाईल कंपनीला स्पष्ट करण्यात आले.

फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे गंभीर परिणाम भोगावे लागत असल्याने या टॉवरला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. महापालिकेत झालेल्या सुनावणी प्रसंगी सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांना मोबाईल टॉवरला विरोध असलेल्या 95 स्थानिक नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. 

या बैठकीसाठी जागा मालक प्रमिला कानडे व आनंद कानडे, मोबाईल कंपनीकडून अ‍ॅड. विवेक भापकर, तर स्थानिक नागरिकांच्या वतीने अ‍ॅड. कारभारी गवळी, लता बोरा, डॉ. अनिल बोरा, माधवी दांगट, वसुधा शिंदे, ललीता गवळी उपस्थित होते.

या सुनावणीत अ‍ॅड. गवळी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाने जनतेच्या हरकतींचा निपटारा केल्याशिवाय अशा टॉवरला परवानगी देण्यास बंदी केली आहे. तर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने इमारतीच्या छतावर टॉवर उभारण्यास संपूर्ण राज्यात बंदी टाकली असल्याचा निवाडा सादर केला. तर महाराष्ट्रासह नगर शहरात मोबाईल टॉवर संदर्भात कोणतेही नियम पाळले जात नसल्याबाबतचा युक्तीवाद केला. अ‍ॅड. विवेक भापकर यांनी या विषयासंदर्भात वेळ मागितली असता, नगररचनाकार यांनी पुढील सुनावणी 11 ऑक्टोबरला ठेवली असल्याची माहिती अ‍ॅड. गवळी यांनी दिली आहे.

COMMENTS