Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

मोतीहारीत नेत्याचा ताफा रोखला; संतप्त नागरिकांनी एकाच वेळी हॉर्न वाजवून पोलिसांना नमवले!

बिहार : नेते आणि लोकप्रतिनिधींच्या 'व्हीआयपी संस्कृती'विरोधात सामान्य जनतेचा राग आता थेट रस्त्यावर येऊ लागला आहे. बिहारच्या मोतीहारीमधून एक अतिशय

खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
…म्हणून शिक्षक विभागाने पाठवली शाळेला नोटीस l LOKNews24
गडचिरोली : आठ हजार बोअरवेल पूर्ण करण्याचे नियोजन –मंत्री आशिष जयस्वाल
PM Narendra Modi cuts down his convoy size: Sources | Dailyhunt

बिहार : नेते आणि लोकप्रतिनिधींच्या ‘व्हीआयपी संस्कृती’विरोधात सामान्य जनतेचा राग आता थेट रस्त्यावर येऊ लागला आहे. बिहारच्या मोतीहारीमधून एक अतिशय थक्क करणारी घटना समोर आली आहे, जिथे एका बड्या नेत्याच्या ताफ्यासाठी रस्ता अडवणाऱ्या पोलिसांना आणि नेत्याला जनतेने चांगलाच धडा शिकवलाय.
होय, सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. एका व्हीआयपी नेत्याचा ताफा सुरक्षितपणे निघून जावा म्हणून पोलिसांनी नेहमीप्रमाणे मुख्य रस्ता अडवला. पण, तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या संतप्त नागरिकांचा संयम सुटला आणि शेकडो दुचाकीस्वार आणि पायी चालणाऱ्या नागरिकांनी मागे हटण्यास स्पष्ट नकार दिला.
नागरिकांनी केवळ विरोधच केला नाही, तर शेकडो गाड्यांचे हॉर्न एकाच वेळी सलग वाजवून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. “सामान्य माणसाचा रस्ता बंद करून व्हीआयपींसाठी ही विशेष व्यवस्था का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असूनही, लोकांच्या या प्रचंड आक्रोशामुळे व्हीआयपींचा ताफा बराच वेळ एकाच जागी अडकून पडला.
नेत्यांच्या या व्हीआयपी संस्कृतीमुळे वैद्यकीय आणीबाणी, रुग्णवाहिका आणि सामान्य लोकांच्या दैनंदिन कामांचा मोठा खोळंबा होतो, ज्यामुळे बिहारमधील जनतेत तीव्र असंतोष आहे. अखेर वाढता तणाव पाहून पोलिसांना नमते घ्यावे लागले आणि रस्ता मोकळा करावा लागला.
मोतीहारीतील सामान्य जनतेने एकजुटीने दाखवलेली ही ताकद आणि व्हीआयपी संस्कृतीला दाखवलेला हा आरसा आता केवळ बिहारमध्येच नाही, तर संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे.

COMMENTS