Homeताज्या बातम्या

पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराची चौकशी करा; २२ जून रोजी आंदोलनाचा किशोर हरेर आणि शहानवाज शेख यांचा इशारा

पाथर्डी : पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अत्यंत अपुऱ्या सुविधा मिळत असून, औषध खरेदीत मोठा गैरव्यवहार केला जात आहे. या सर्व प्रकारांच

श्रीगोंद्यात भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी लाचेची मागणी; महसूल सहाय्यकासह कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
मोहा हद्दीतील अवैध कलाकेंद्र बंद करा; अन्यथा अमरण उपोषण करणार: सचिन आजबे यांचा इशारा
राहुरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उंडे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६’ प्रदान; महात्मा फुले कृषी विद्यापीठात भव्य सोहळा

पाथर्डी : पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना अत्यंत अपुऱ्या सुविधा मिळत असून, औषध खरेदीत मोठा गैरव्यवहार केला जात आहे. या सर्व प्रकारांची तातडीने चौकशी करावी; अन्यथा येत्या २२ जून रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर हरेर व शहानवाज शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन दरंदले हे गेल्या सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. रुग्णालयात आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांकडून पैसे उकळले जातात आणि नंतर त्याच औषधांचे बिल शासनाकडे सादर करून रक्कम खर्च दाखविली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच महिलांच्या नसबंदी शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्णांना भीती दाखवून खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर किती रुग्ण बाहेर गेले, याची नोंद तपासून चौकशी केल्यास मोठे गैरप्रकार बाहेर पडतील, असे त्यांनी म्हटले आहे.

रुग्णालयातील शवविच्छेदन (Post-Mortem) कक्षाची अवस्था दयनीय झाली असून, छताचे प्लास्टर कोसळले आहे. तसेच सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. एका महिलेकडून शस्त्रक्रियेसाठी बेकायदेशीरपणे १६ हजार रुपये घेतले असून, त्याचीही चौकशी व्हावी. रुग्णालयातील ९ रिक्त पदे तातडीने भरावीत आणि मंजूर १०० खाटांचे रुग्णालय व स्वतंत्र स्त्री रुग्णालय उभारणीबाबत काय कार्यवाही झाली, याची माहिती द्यावी, अशी मागणी किशोर हरेर व शहानवाज शेख यांनी केली आहे.

COMMENTS