पाथर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४ हजार ३९९ दिवस देशाचे पंतप्रधान म्हणून कार्य करत सर्वाधिक कालावधीचा विक्रमी कार्यकाळ पूर्ण केल्याच्या

पाथर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग ४ हजार ३९९ दिवस देशाचे पंतप्रधान म्हणून कार्य करत सर्वाधिक कालावधीचा विक्रमी कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र मढी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते श्री क्षेत्र कानिफनाथ महाराज संजीवन समाधी मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच पाथर्डी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीराम चौक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचे भव्य फलक लावण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मूलमंत्राच्या आधारे देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनांमुळे शासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ‘लखपती दीदी’ अभियान आणि गरीब कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणाऱ्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून आले आहेत.’’
या कार्यक्रमाला पाथर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे, पुरुषोत्तम आठरे, धनंजय बडे, भगवान मरकड, मृत्युंजय गर्जे, नगरसेवक नंदकुमार शेळके, अमोल गर्जे, देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, विश्वस्त दादासाहेब मरकड, अनिल साठे यांच्यासह भाजपचे तालुका व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS