Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातुन आरोपींची निर्दोष मुक्तता

बीड प्रतिनिधी - बीड पासून जवळच असणार्‍या समनापुर शिवारामध्ये राहणारी फिर्यादी हिने आरोपी शेख अफसर व इतर पाच आरोपी यांचे विरोधात कलम 143,354,504,

विषारी फेसानं कोंडतोय इंद्रायणी नदीचा श्वास
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या हस्ते पत्रकारांना स्वलिखीत पुस्तके व छत्रीचे वाटप..
इंजेक्शनच्या त्या व्हीडिओने उडवली खळबळ ; आनंदऋषीजी हॉस्पिटलने केला खुलासा

बीड प्रतिनिधी – बीड पासून जवळच असणार्‍या समनापुर शिवारामध्ये राहणारी फिर्यादी हिने आरोपी शेख अफसर व इतर पाच आरोपी यांचे विरोधात कलम 143,354,504,506 भा.द.वी. आणि कलम 3 (ळ) (ुळ) अ‍ॅट्रॉसिटीज अ‍ॅक्ट नुसार गुन्हा नोंद केला होता. सदरील प्रकरणात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. भिमराव चव्हाण यांनी बाजू मांडली. म.न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडण्याचा आदेश केलेला आहे.
प्रकरणातील फिर्यादी हिने आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ करून विनयभंग आणि मारहाणक ेली असल्याचा आरोप करून ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद केला होता. सदरील प्रकरणात पोलिसांनी चार्जशिट दाखल केले नंतर सरकार पक्षाकडून एकूण 5 साक्षीदार तपासले. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. चव्हाण यांनी बाजु मांडून फिर्यादी आणि इतर साक्षीदारासंमच्या सरतपासाला जोरदार प्रतिप्रश्न विचारून भक्कम बाजु मांडली. प्रकरणातील फिर्यादी हिने पुर्वी देखील अशीच अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत खोटी केस केली असल्याचे आणि आरोपी आणि फिर्यादी यांचे पुर्वीचे जमिनीचे दिवाणी बाद म.न्यायालयात प्रलंबीत असल्याचे पुरावे देवून योग्य आणि अचुक प्रश्न फिर्यादीला विचारून आरोपीची बाजु मांडली. प्रकरणातील साक्षीदार, पिडीता यांचे सरतपास, उलट तपास यातील विसंगती मा.न्यायालयात त्याच्या लक्षात आणुन दिले नंतर मा. जिल्हा व सत्र न्यायालय पहिले ’यांनी आरोपींची ठोस पुराव्या अभावी एकूण 6 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. भिमराव चव्हाण यांनी बाजु मांडून त्यांना अ‍ॅड. एल. आर. जगताप, अ‍ॅड. एफ. एन. चव्हाण, अ‍ॅड.बी.डी. जगताप यांनी सहकार्य केले.

COMMENTS