Homeताज्या बातम्याशहरं

सामान्य जनतेच्या पोटावर मारण्याचे काम पालिका प्रशासनाने करू नये : वैभव पवार

पालकमंत्र्यांनी 31 वर्षाच्या सत्ता काळात काय केले?इस्लामपूर / प्रतिनिधी : विकास आघाडी व शिवसेनेने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल असे ठराव केले आहे

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
भीषण अपघात ! चिमुकल्या मुलीचा मृत्यू
सिमेंटच्या गोदामातून 700 खोके अवैध मद्यसाठा जप्त

पालकमंत्र्यांनी 31 वर्षाच्या सत्ता काळात काय केले?
इस्लामपूर / प्रतिनिधी : विकास आघाडी व शिवसेनेने पालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल असे ठराव केले आहेत. पालिकेवर प्रशासक आल्यापासून सामान्य जनतेच्या पोटावर मारण्याचे काम होत आहे. हे काम कोण्याच्या सांगण्यावरून करत आहात, असा आरोप विकास आघाडीचे उपाध्यक्ष व माजी नगरसवेक वैभव पवार यांनी उपस्थित करत पालकमंत्र्यांची पालिकेवर 31 वर्षे सत्ता असताना नागरिकांचे प्रश्‍न का सोडवले नाहीत? असा सावल ही त्यांनी उपस्थित केला.
ते इस्लामपूर येथील पत्रकार बैठकीत बोलत होते.
वैभव पवार म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांना गेली 35 वर्षे इस्लामपूर शहरातील नागरिकांनी विधानसभेत मोठ्या विश्‍वासाने पाठवले. 31 वर्षे नगरपालिकेची एक हाती सत्ता दिली. तरीही शहरातील नागरीकांचे नागरी प्रश्‍न सुटले नाहीत. शहरावर ऐवढेच प्रेम होते तर निधी नगरपालिकेकडे वर्ग न करता बांधकाम खात्याकडे का वर्ग केला? त्यांनी अवैद्य व्यवसायाला खत पाणी घातले आहे. टेरर गँग तयार करून वाळवा तालुक्याचा सुसंस्कृत विचार पुसण्याचे काम ते करत आहेत. नगरपालिकेतील त्यांच्या बगलबच्चांनी केलेला कारभार हा लोकशाहीचा अपमान करणारा आहे. कोट्यवधी निधी खर्चून नगरपालिकेने उभा केलेल्या अनेक इमारती नाममात्र भाडे पट्टयाने घेवून पालिकेचे आर्थिक नुकसान केले.
ते म्हणाले, भुयारी गटर योजना विकास आघाडीच्या काळात मंजूर झाली. 69.42 कोटी इतका निधी मंजूर झाला. त्याचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याचे प्रत्यक्ष काम ही चालू आहे. 24 बाय 7 पाणी योजना ठराव करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. आपण शासनाच्या मंत्री मंडळात असूनही हा प्रस्ताव मंजूर करून घेतला नाही. आमच्या काळात सभागृहातील कामकाजाचे थेट प्रेक्षपण सुरू करून कारभारातील पारदर्शकता जनतेसमोर ठेवली. तुमच्या सत्ताकाळातील बेकायदेशीर कामकाज ही जनतेसमोर प्रकाशात आणले. आपले नगरसेवक किती कर्तव्यदक्ष व कार्यक्षम आहेत, हे वेळोवेळी सिध्द झाले आहे.

आत्ताच आढावा बैठकीचा हट्टाहास का?
पालकमंत्री झाल्यापासून नगरपालिकेत आला नाही. मात्र, प्रशासक येताच आढावा बैठकीचा हट्टाहास का केला. सन 1985 मध्ये पालिकेच्या सभागृहात स्व. यशवंतराव चव्हाण व स्व. वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमा लावण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, 31 वर्षात वसंतदादांची प्रतिमा का लावली नाही. मात्र, आढावा बैठकीत हा ठराव पाहण्याची उत्सुकता जयंत पाटील यांना राहवली नाही.

पॅकेज संस्कृती..
शहरात सध्या पालकमंत्री व त्यांची सोनेरी टोळी नागरिकांच्या घराघरात जावून येणार्‍या निवडणुकीच्या तोंडावर पॅकेज देण्याची आश्‍वासने देत असल्याची चर्चा, असल्याचे ही वैभव पवार यांनी सांगितले.

COMMENTS