Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाधान शिबिरास नेकनुरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांना विविध सेवांचा गावातच लाभ; अनेक विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी; लाभ घ्यावा – तहसीलदार शेळके

नेकनुर : शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत मंडळ विभाग नेकनुर येथे 24 एप्रिल रोजी समाधान

अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
नाळवंडी मंडळातील समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसादनागरिकांना गावातच विविध सेवांचा लाभ देण्याचा जिल्हाधिकारी यांचा निर्धारअनेक विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध; लाभ घ्यावा-तहसीलदार शेळके
चारधाम यात्रेत दोन भाविकांचा मृत्यू; मृतांमध्ये महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील भाविकांचा समावेश

नेकनुर : शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत मंडळ विभाग नेकनुर येथे 24 एप्रिल रोजी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.नेकनुर परिसरातील माऊली मंगल कार्यालय येथे आयोजित या शिबिरात शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक घटकांनी सहभाग घेत शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला.
राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू केले आहे. नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा गावपातळीवर उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे तसेच विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव हे स्वतः विविध ठिकाणी भेटी देत मार्गदर्शन करत आहेत. नेकनुर येथील शिबिराने या उद्दिष्टांना प्रत्यक्ष स्वरूप दिल्याचे दिसून आले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे, ग्राम महसूल अधिकारी शरद इथापे, सर्वेश कांबळे, स्वाती, कमलेश निर्मळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. उपसरपंच व युवा नेते जिया भाई शेख यांनीही नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या शिबिरात महसूल विभागासह विविध विभागांचे माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते. जमीन नोंदणी, वारस नोंद, डिजिटल सातबारा उतारे, विविध दाखले व प्रमाणपत्रे, केवायसी प्रक्रिया, आधार नोंदणी, तसेच विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच जिवंत सातबारा, मयत खातेदार कमी करणे, वर्ग दोनचे वर्ग एकमध्ये रूपांतर, वारस फेरफार, पाणी नोंद, नोंदणी प्रक्रिया, वसुली पावत्या, सेवा मित्र प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, पानंद रस्ते योजना, अभिलेख दुरुस्ती, मोफत आरोग्य तपासणी, घरकुल मंजुरी, गायरान मंजुरी आदेश तसेच शेततळे योजनांची माहिती देण्यात आली. याशिवाय डिजिटल सातबारा उतार्‍यांचे वाटप, विविध प्रमाणपत्रांचे वितरण आणि मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्रास्ताविकात नायब तहसीलदार जाधवर यांनी सांगितले की, गावपातळीवर जाऊन नागरिकांना सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे गोरगरिबांना मोठा दिलासा मिळत आहे. तसेच तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पुढाकारामुळे अशा उपक्रमांना गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. एकूणच, नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे नेकनुर येथील समाधान शिबिर यशस्वी ठरले असून शासनाच्या सेवा घरपोच देण्याच्या संकल्पनेला बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS