Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पटोले विरुद्ध थोरात वाद विकोपाला

बाळासाहेब थोरातांनी दिला विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा

अहमदनगर/मुंबई ः नाशिक पदवीधर निवडणुकीतून सुरू असलेले पटोले-थोरात वाद आता विकोपाला जातांना दिसून येत आहे. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते यांनी दोन दिवसां

राजूर पोलिसांचा विशेष कामगिरीमुळे गौरव
विखेंचे बॅलन्सशीट तपासण्याची वेळ आता आली आहे… तनपुरेंचा सूचक इशारा
अहमदनगरच्या उड्डापुलाचे उद्घाटन करण्याची घाई कशासाठी ?

अहमदनगर/मुंबई ः नाशिक पदवीधर निवडणुकीतून सुरू असलेले पटोले-थोरात वाद आता विकोपाला जातांना दिसून येत आहे. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते यांनी दोन दिवसांपूर्वीच यावर भाष्य करतांना, आपण आपली तक्रार पक्षश्रेष्ठीकडे केली असून, त्यावर जाहीर बोलणे टाळले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी पटोले यांच्याविषयी तक्रारीचा सूर विदर्भातील नेत्यांकडून उमटला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळीच थोरात यांनी काँगे्रसच्या विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र काँगे्रसमध्ये भूकंप झाला. विधान परिषदेच्या निकालानंतर आलेल्या थोरातांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील पक्षांतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर काँग्रेसमधील कलह टोकाला गेल्याचे सर्वांसमोर आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सत्यजीत तांबे यांच्या पत्रकार परिषदेतून महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी उघडपणे जाहीर झालेली होती. अशातच आता बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर ही नाराजी अगदी टोकाला पोहोचल्याचे बोलले जातेय. बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद सोडले. त्यानंतर नाना पटोले यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. पण विधीमंडळ पक्षनेते हे महत्त्वाचे पद बाळासाहेब थोरात यांच्याकडेच होते.

पण आता बाळासाहेब थोरात यांनी या पदाचाही राजीनामा दिल्याची बातमी पुढे आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी देखील बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. या निवडणुकीत नाना पटोले यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायचे कसे, असा प्रश्‍न थोरात यांनी पत्रात उपस्थित केला होता. विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही पटोले यांच्याविरोधात तक्रार केली होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर नाना पटोले त्याचेही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतायत, असा आरोप त्यांनी केला होता. तर, नाना पटोले यांची भूमिका ही वेगळ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची होती. पण आमच्या आग्रहापायी काँग्रेसने दिलेला उमेदवार निवडून आला. आता त्याचे श्रेय पटोले घेतायत, अशी तक्रार विदर्भातील नेत्यांनी हायकमांडकडे केली होती.
दरम्यान, काँगे्रसचे नेते अशोक चव्हाण यासंदर्भात म्हणाले की, बाळासाहेब थोरात काँगे्रसचे ज्येष्ठ नेते असून, त्यांची भेट घेणार असून, यासंदर्भात चर्चा करणार असून, पक्ष लवकरच बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करेल. त्याचबरोबर राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांनी देखील तात्काळ दिल्लीतून महाराष्ट्रात पाठवण्यात आले असून, ते थोरात यांची चर्चा करणार आहे.

निर्णय प्रक्रियेतून डावलल्यामुळे घेतली भूमिका – खरंतर बाळासाहेब थोरात काँगे्रसचे ज्येष्ठ नेते असून, विधिमंडळाचे गटनेते देखील आहेत. तरी देखील सत्यजित तांबेंना एबी फॉर्म देतांना केलेली चूक, परत कोरा फॉर्म देतांना केलेली चूक यावर प्रदेश कार्यालयाने थोरात यांच्याशी बोलायला हवे होते. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांचे केलेले निलंबन, यासंदर्भात देखील थोरात यांच्यासोबत चर्चा न केल्यामुळे थोरात नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS