कोविड निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार अनुदान : आ. आशुतोष काळे

Homeअहमदनगर

कोविड निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ५० हजार अनुदान : आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :- राज्यातील कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारस नातेवाईकास सानुग्रह सहाय्य देण्याच्या महाविकास आघाडी

kopargav:विकासाचे अनुत्तरीत प्रश मार्गी लावणे माझे आद्य कर्तव्यच : आ. आशुतोष काळे| LokNews24
अकरा गावेही विकासाच्या रडारवर – आ. आशुतोष काळे 
कोरोनाच्या संकटाचा विकासावर परिणाम होवू दिला नाही – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी :- राज्यातील कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या वारस नातेवाईकास सानुग्रह सहाय्य देण्याच्या महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार ज्या व्यक्तींचे कोव्हिड -१९ या आजारामुळे निधन झाले आहे. त्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना (वारसांना) ५०,०००/- रुपये (पन्नास हजार) सानुग्रह सहाय्य देणार आहे अशी माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. मागील वर्षी आलेल्या जीवघेण्या कोविड आजाराच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्यातील लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे त्या कुटंबापुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा कुटुंबाना आर्थिक आधार देण्यासाठी मृत व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ५०,०००/- रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. हे सानुग्रह सहाय्य मिळविण्यासाठी कोव्हिड-१९ या आजाराने निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाइकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोविड -१९ आजाराने निधन झालेल्या व्यक्तीची कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांच्या मृत्यू अहवालात नमूद असणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यक्तीने कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आत्महत्या केली असल्यास या मृत व्यक्तीचे नातेवाईक देखील या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र ठरणार आहेत. अशा प्रकारे कोविडमुळे निधन झाल्याचे संबंधित अधिकाऱ्याच्या अहवालानुसार हे सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराचा स्वत:चा आधार तपशील, बँक खात्याचा तपशील, कोविड-१९ मुळे मृत झालेल्या व्यक्तीचा तपशील, मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू दाखला व इतर नातेवाईकांचे नाहरकत स्वयंघोषित घोषणापत्र आवश्यक आहे. याप्रमाणे कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन झाले आहे त्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्य मिळविण्यासाठी आपले अर्ज दाखल करण्यासाठी कोपरगाव व कोळपेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. कोव्हिड -१९ या आजारामुळे निधन झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या नातेवाईकांना (वारसांना) ५०,०००/- रुपये (पन्नास हजार) सानुग्रह सहाय्य देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहे.

COMMENTS