बीड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पेठ बीड पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व सर्व समाजातील प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या

बीड : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पेठ बीड पोलीस स्टेशन येथे शांतता समिती व सर्व समाजातील प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी सण शांततेत, सलोख्याच्या वातावरणात व कायद्याचे पालन करून साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी बीडचे पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) वेंकटरमण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बकरी ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बांधवांनी शांतता व सामाजिक सलोखा राखत कायद्यानुसार निर्धारित प्रक्रिया पाळून सण साजरा करावा. सर्वांनी प्रशासनाला सहकार्याची भूमिका दाखवून सण उत्साहात पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व नागरिकांनीही आपापल्या सूचना व मते मांडली. यावेळी शितलकुमार बल्लाळ, पेठ बीडचे पोलीस निरीक्षक खेडकर, समाजसेवक मुसाखान पठाण, नगरसेवक अॅड. महेश धांडे, अशोक कांबळे, फारुख पटेल, मोईन मास्टर, अश्फाक इनामदार, खुर्शीद आलम, अमर जान पठाण, इसा खान तसेच प्रा. अंकुश चव्हाण यांच्यासह विविध स्तरांतील लोकप्रतिनिधी, पत्रकार, मुस्लिम धर्मगुरू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी बकरी ईद शांतता, बंधुता आणि सामाजिक सलोखा जपत साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

COMMENTS