Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने जुगाड प्रेमाचा वेब सिरियल च्या कलाकारांचा सत्कार 

बुलडाणा प्रतिनीधी - अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने चिखली येथील जुगाड प्रेमाचा या वेब शॉर्ट फिल्म कलाकारांचा सत्कार आज दि.८ ऑगस्ट

गणेशोत्सवासाठी कोपरगाव पोलिसांनी घेतली शांतता समितीची बैठक
कोरोना लसीकरणासाठी सक्ती नको | DAINIK LOKMNTHAN
नाशिकच्या पंचताराकिंतमधील हानीट्रपमधे अडकलेले ते अधिकारी कोण ?

बुलडाणा प्रतिनीधी – अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या वतीने चिखली येथील जुगाड प्रेमाचा या वेब शॉर्ट फिल्म कलाकारांचा सत्कार आज दि.८ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी तीन वाजता धाड नाका येथील गुरु रविदास अर्बन बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष इंजि. अशोक भोसले, प्रमुख उपस्थिती मध्ये युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, विदर्भ अध्यक्ष शरद खरात,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभाताई चांदोरे, जेष्ठ विचारवंत कवी रमेश खंडारे,जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. शिवाजी जोहरे,सल्लागार डॉ बबन परमेश्वर आदींची उपस्थिती होती, या वेळी रवि शिराळे यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी विषद केल्या, तसेच रवि शिराळे यांनी कलर्स मराठी, झी मराठी वर चालु आसलेल्या सिरियल मध्ये सुध्दा काम केले आहे,गजानन बोर्डे,मदन गायकवाड, अनिल शिराळे,शोभा सुरडकर, सुप्रिया मुंगळे,प्रगति निकाळजे, गजानन सुरडकर,मिना इंगळे, काळे पेंटर,कलीम शाहा, गवई ताई यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुत्र संचलन पुरुषोत्तम बोर्डे यांनी तर आभारप्रदर्शन प्रदर्शन शरद खरात यांनी केले.

COMMENTS