Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेल्फीच्या नादाने पिंडालाही कावळा शिवेना – कवी भागवत मसणे; नवगण महाविद्यालयात पदवी प्रदान कार्यक्रम उत्साहात

परळी वै. : येथील नवगण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कला, वाणिज्य व बीसीए शा

जिद्द आणि मेहनतीचे फळ: मांडवीच्या कु. ज्ञानदा कांबळे यांची मुंबईत ’एमटीएस’ पदी झेप!
सूर्यकांत काळे यांच्यासारख्या शिक्षकांची समाजाला गरज-खा.बजरंग सोनवणे;केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा थाटात; शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
उंडेमळा शाळेतील विविध उपक्रम कौतुकास्पद : गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड
आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज परली - आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज परली

परळी वै. : येथील नवगण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कला, वाणिज्य व बीसीए शाखेतील विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रदान समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, प्रख्यात कवी व साहित्यिक श्री. भागवत मसणे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे व डॉ. मधुकर आघाव यांची प्रमुख उपस्थिती होती. समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवी भागवत मसणे यांनी सेल्फीच्या नादाने पिंडालाही कावळा शिवेना या प्रभावी विधानातून आधुनिक तरुणाईच्या बदलत्या जीवनशैलीवर भाष्य केले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना जीवनमूल्यांची जपणूक करावी, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. तसेच डॉ. सुधाकर गुट्टे यांनी पदवी प्राप्तीनंतर विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून समाजात उभे राहून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू घोलप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुदर्शन अवस्थी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. महेश दाडगे, डॉ. राजा आचार्य, डॉ. अनुरथ चंड्रे, डॉ. शेळके तसेच इतर प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. या पदवी प्रदान समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.

COMMENTS