Homeताज्या बातम्या

श्रीदत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; २९ जुलै रोजी मुख्य सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आष्टी: शहरासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा क

दिल्लीतील आंदोलनाला अकोले राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) पाठिंबा; तहसीलदारांना दिले निवेदन
किनवटचा ’कोंडवाडा’ आणि प्रशासनाचे ’बधिर’ मौन! मोकाट गाढवे व खेचरांमुळे नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी एकजुटीचा विजय: राजेंद्र आमटे

आष्टी: शहरासह पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. प.पू. रघुनाथ महाराज कालकुंदरीकर व प.पू. शामला रघुनाथराव कालकुंदरीकर यांच्या प्रेरणेने २३ ते ३० जुलै या कालावधीत विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवानिमित्त २३ ते २५ जुलै दरम्यान श्री गुरुचरित्र, श्री दत्त महात्म्य व श्री स्वात्मसौख्य या पवित्र ग्रंथांचे पारायण तसेच अखंड पारायण कार्यक्रम पार पडले. २६ जुलै रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर २७ जुलै रोजी श्री गणेशयाग देवता स्थापना पार पडली असून, २८ जुलै रोजी गणेशयाग स्वाहाकार हवन व पूर्णाहुतीचा धार्मिक विधी पार पडणार आहे.

उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला गुरुपौर्णिमा (व्यासपूजा) सोहळा २९ जुलै रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, सायंकाळी आरतीनंतर श्री दत्तगुरूंची पालखी मंदिरातून निघणार आहे. गुरुपौर्णिमा सप्ताहाची सांगता ३० जुलै रोजी दुपारी १ ते ३:३० या वेळेत महाप्रसाद वाटपाने होणार आहे. त्यानंतर सायंकाळी गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

श्री दत्त मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध कामे करण्यात आली आहेत. या पवित्र गुरुपौर्णिमा उत्सवाचा आणि धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी आष्टी शहरासह परिसरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS