Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या कोटा मेंटॉर्स स्कूलबाबत पालकाची तक्रार

कर्जतः कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलच्या गैरकारभाराबाबत पालक किरण जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे 28 ऑगस्ट 2023 रोजी लेखी तक्रार अर्ज

वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी
सामाजिक ऋण निस्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया
संजीवनी कोविड सेंटर मुळे तालुक्याला मिळाला दिलासा

कर्जतः कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स स्कूलच्या गैरकारभाराबाबत पालक किरण जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे 28 ऑगस्ट 2023 रोजी लेखी तक्रार अर्ज केलेला आहे. मात्र त्या अर्जाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने प्रतिसाद न दिल्याने जगताप यांनी शिक्षण विभागाला स्मरणपत्र दिले आहे.
पत्रात म्हटले आहे, माझा मुलगा संस्कार जगताप हा कोटा मेंटॉर्स स्कूलमध्ये दुसर्‍या इयत्तेत शिकत आहे. त्याचा आरटीईमधून प्रवेश झालेला असूनही शाळेतून त्याच्या 13000 रुपयांच्या फीची सक्तीने मागणी करण्यात आली. याबाबत तसेच शाळेतून गणवेश, बुट व इतर साहित्याची अनधिकृतपणे होत असलेली विक्री, शाळेतून पालकांना दिल्या जात नसलेल्या पावत्या, शिक्षकांना नियुक्ती आदेश, वेतन न देणे, शाळेमध्ये विविध माहिती फलक न लावणे, शालेय इमारतीचा इतर कामांसाठी वापर करणे, अपुर्‍या माहितीच्या आधारे शाळेची जाहिरातबाजी करणे अशा 7 मुद्द्यांच्या आधारे सविस्तर तक्रार देण्यात आली होती. तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी अशी तक्रार अर्जातून करण्यात आली होती. मात्र लेखी तक्रार देवून 40 दिवस  झाले तरी शिक्षण विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याबाबतची लेखी स्वरूपातील माहिती पुढील 7 दिवसात न दिल्यास आपल्याविरुद्ध वरिष्ठ कार्यालय तसेच विविध विभागांकडे तक्रार दिली जाणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

COMMENTS