Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने काँग्रेससोबत जाण्यास मजबूर केले – उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपसोबत आमची 25 वर्षे युती होती. भाजपच्या पडत्या काळात आम्ही त्यांना साथ दिली, मात्र त्यांनी आम्हाला काँगे्रससोबत जाण्यास मजब

नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
विरोधक खोटे आरोप करत असून आम्ही कुठल्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार;- भाजपाचे विरोधकांना आवाहन …
सशस्त्र दलाच्या 58 व्या तुकडीचे पुण्यात दीक्षान्त संचलन

मुंबई/प्रतिनिधी ः भाजपसोबत आमची 25 वर्षे युती होती. भाजपच्या पडत्या काळात आम्ही त्यांना साथ दिली, मात्र त्यांनी आम्हाला काँगे्रससोबत जाण्यास मजबूर केल्याचा दावा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. गोरेगाव येथे आयोजित उत्तर भारतीय मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
शिवसेना आणि भाजपची युती झाली तो दिवस आपण आठवलो, तर शिवसेना आणि भाजप देशाच्या राजकारणात आपले अढळस्थान होते. शिवसेना आणि भाजप आम्ही एकत्र होतो तेव्हा आमच्याबाजूलाही कुणी येण्याची हिंंमत नव्हती. भाजपच्या पडत्या काळात माझ्या वडीलांनी भाजपला सांभाळले. उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा भाजपचा वाईट काळ होता तेव्हा माझ्या वडीलांनी भाजपचे पंतप्रधान वाचवले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करूया असे म्हटले होते. त्यांनी जर राजधर्माचे पालन त्यांनी केले असते तर आज जे बसले ते पंतप्रधानपदी बसलेच नसते. उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदु आहोत म्हणजे फक्त मराठीच का तर नाही जेही देशाचे द्रोही असतील मग ते हिंदु का असेना पण ते देशाचे द्रोही होते ही भावना लक्षात घेवून शिक्षा व्हावी हे बाळासाहेबांचे विचार होते. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. उत्तर भारतीयांचे नाते मजबूत करायला मी आलो. उद्धव ठाकरे म्हणाले, आमची युती तुटली तेव्हा आणि आताही आम्ही हिंदु आहोत. आमचा त्यांनी हात सोडला, पण आमचे हिंदुत्व कायमच आहे. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. ते जे चालवत आहेत ते हिंदुत्व नाही. ते आमचे हिंदुत्व नाही. उत्तर भारतातील काशीतून शिवरायांच्या राज्यभिषेकासाठी गागाभट्ट आले होते. आज आम्ही उत्तर भारतात आलो तर कुरीअरचे पार्सल (राज्यपाल) उत्तर भारतात वापस चालले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेससोबत जाण्यासाठी आम्हाला भाजपने मजबूर केले. गळ्यात पट्टा घालून कुणाची गुलामगिरी करणारा मी नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडले असे होत नाही. काल परवा मोदी महाराष्ट्रात येऊन पोळी शेकुन गेले. बोहरा समाजाच्या कार्यक्रमात येऊन त्यांनी आपली पोळी भाजून घेतली. बोहरा समाजाच्या विरोधात मी नाही, ते चांगले लोक आहे. मी तेथे गेलो असतो आणि त्यांना चांगले म्हटले असते तर मी हिंदुत्व सोडले अशी टीका झाली असती. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. 

COMMENTS