Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश संकुलाच्या कर्मचार्‍यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम मंत्री जयंत पाटील करतात : अभिजित पाटील

प्रकाश हॉस्पिटलच धावले कोरोनासाठी मात्र प्रशासनाच्या मदतीतून वगळलेकोरोना सारख्या संकटाच्या सुरुवातीच्या काळात 650 इतक्या बेडला ऑक्सिजन पुरवठा पुर

लाल महालात चित्रीकरण करणार्‍यांविरोधात कडक कारवाई करा : खा. उदयनराजे
मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत पाचगणी पालिका प्रथम: स्वच्छता पुरस्कारात पांचगणी नगरपरिषदेची मांदियाळी
राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा सक्षम करणार : ना. शंभूराज देसाई

प्रकाश हॉस्पिटलच धावले कोरोनासाठी मात्र प्रशासनाच्या मदतीतून वगळले
कोरोना सारख्या संकटाच्या सुरुवातीच्या काळात 650 इतक्या बेडला ऑक्सिजन पुरवठा पुरवून स्वतःचा ऑक्सीजन प्लांट प्रकाश हॉस्पिटलने उभा केला होता. मात्र, जेमतेम बेडला पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावापोटी परवानगी देण्यात आली. सांगली सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांच्या विनंतीनुसार सिव्हील हॉस्पिटलसाठी प्रकाश हॉस्पिटलच्या वतीने एक व्हेंटिलेटर मदत म्हणून दिला गेला. मात्र, दरम्यानच्या काळात पंतप्रधान सहाय्यता केंद्र व अनेक सेवाभावी संस्था यांच्याकडून जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलच्या मदतीसाठी व रुग्णांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक व्हेंटिलेटर आले आहे होते. ते जिल्ह्यातील अनेक प्राथमिक उपचार करणार्‍या सेंटरला देण्यात आले. मात्र, या मदतीच्या यादीतून प्रकाश संस्थेचे नाव राजकीय दबावापोटी जिल्हा परिषदेने वगळले. हे अत्यंत दुर्देवी आहे. यावरून पालकमंत्री जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकत्व निभावताना असमर्थ आहेत, असे स्पष्ट होते त्यांचे द्वेषाचे व खुनशी राजकारण यावरून दिसून येते.

इस्लामपूर / प्रतिनिधी : प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधील डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील करत आहेत. हा विकृत विचार आम्हा कामगारांची कुटुंब उध्दवस्त करणार आहे. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी, अस्तित्वासाठी पहिल्या टप्प्यात गांधीगिरी मार्गाने राज्यपाल, लोकायुक्त, राज्यकर्ते, अधिकारी यांच्याकडे दाद मागणार आहोत. यांनी न्याय न दिल्यास आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती प्रकाश शिक्षण कामगार युनियनचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बैठक इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर मध्ये घेण्यात आली होती. या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष सुजित पाटील, सचिव कुलदीप खांबे, खजिनदार हिम्मत जाफळे, अभिमन्यू पाटील, रणजित पाटील, जयदीप निकम उपस्थित होते.
पाटील म्हणाले, प्रकाश संकुलात आम्ही 1600 हून अधिक कर्मचारी उदरनिर्वाहासाठी निष्ठेने काम करत आहेत. हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल व इतर सहकारी स्टाप कोरोना सारखा संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करत होता. राजकीय वैरत्व डोळ्यासमोर ठेवून विरोधकाला विरोधकांच्या संस्थात्मक संकुलावर व संकुलात काम करणारे डॉक्टर्स यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करणे व भयभीत करणे हे लोकशाहीला धरून नाही. राजकारणाशी आम्हा कर्मचार्‍यांचा कोणत्याही प्रकारचे देणेघेणे नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी राजकारण विरोधकांच्या संस्था मोडीत काढण्यासाठी व कामगारांना उध्दवस्त करण्यासाठी करू नयेत.
खुनशी वृत्तीने राजकीय द्वेषापोटी, बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल करणे, त्यांना अटक करणे, आमच्या मनाचे खच्चीकरण करणे, आमच्यात भीती निर्माण करणे, संस्था बंद करण्याचा प्रयत्न करणे हे अविचाराचे राजकारण थांबले नाही तर आम्हाला भविष्यात आमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी व न्याय हक्कासाठी सुरुवातीला गांधीगिरी मार्गाने न्याय न मिळाल्यास वेळ प्रसंगी सहकुटुंब आम्ही आत्मदहनाचा सारखा मार्ग अवलंबू. याला सर्वस्वी पालकमंत्री जयंत पाटील व आरोग्य अधिकारी व पोलिस अधिकारी हेच जबाबदार असतील, असे शेवटी पाटील यांनी सांगितले.

COMMENTS