पाचगणी परिसरात पावसाची संततधार; रस्ते जलमय

Homeमहाराष्ट्रसातारा

पाचगणी परिसरात पावसाची संततधार; रस्ते जलमय

पाचगणी शहर व पंचक्रोशीतील परिसरात आज सकाळपासून पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असून ठीक-ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते.

Ahmednagar : गोविंद मोकाटे याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल | LOKNews24
उद्धव ठाकरे ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’
नवनीत राणांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना मोठा इशारा.

पाचगणी / वार्ताहर : पाचगणी शहर व पंचक्रोशीतील परिसरात आज सकाळपासून पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असून ठीक-ठिकाणी पावसाचे पाणी साचले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते.

गेली दोन-तीन दिवस पाचगणी व परिसरात हलका पाऊस पडत होता. परंतु कालपासून पावसाने मोठ्या प्रमाणात जोर धरला असून आज सकाळपर्यंत 64 मिमी पाऊस पडला असून यावर्षी आतापर्यंत 397.46 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मोठ्या प्रमाणात पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर सर्व ठिकाणी पावसाचे पाणी वाहत होते. सर्व ठिकाणी दाट धुके पसरले असल्याने चार चाकी, दुचाकी वाहनधारकांना मार्गक्रमण करणे अवघड जात होते. सतत कोसळणार्‍या पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे. भिलार, राजपुरी तसेच पांचगणी शहर व पंचक्रोशीतील परिसरातही पावसाने जोर धरला असून शेतीलाही हा पाऊस पूरक असून त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाबरोबरच हवेत गारठा निर्माण झाला आहे.

कोरोनाच्या संकटाने पांचगणीची बाजारपेेठ चार महिने अत्यावश्यक सेवा वगळता बंदच आहे. या दिवसात पांचगणी बाजारपेठेत जलधारा अंगावर झेलत हिरव्या गार डोंगररांगांचे नयन मनोहर दृश्य टिपण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पण कोरोना परिस्थिती व जिल्हा बंदी यामुळे पर्यटकांना पांचगणीचे दरवाजे मार्चपासूनच बंद आहेत. त्यामुळे पर्यटकांविना बाजारपेठ सुन्न असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

COMMENTS