Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोमय्या महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचा समारोप

कोपरगाव प्रतिनिधी ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के.जे.सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव

महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू ? माजी खासदार किरीट सोमय्यांचा तो व्हिडिओ
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर
आगामी निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी देणार: दीपक निकाळजे

कोपरगाव प्रतिनिधी ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व के.जे.सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु. येथे 9 जानेवारी ते 15 जानेवारी  या काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची थीम युवकांचा ध्यास  ग्राम -शहर विकास अशी होती. शिबिराचा समारोप दिनांक 15 जानेवारी  रोजी झाला. या समारोप प्रसंगी  के.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कांतीलालजी वक्ते हे उपस्थित होते. तसेच गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापकीय अध्यक्ष आदिनाथ ढाकणे आणि डाऊच बुद्रुक गावचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच भीवराव दहे तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व  ग्रामस्थ उपस्थित होते तसेच गावचे ग्रामस्थ व निवृत्त सैनिक गायकवाड साहेब हे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना कांतीलालजी वक्ते म्हणाले की, स्वयंसेवकांनी स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करायचा असेल तर एनएसएस शिबिरासारखे दुसरे प्रभावी साधन नाही. एनएसएस शिबिराच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी स्वतःचा विकास करून पर्यावरणाचे संरक्षण करावे जागतिक तापमानवाढ, तापमान बदल त्याचबरोबर नदीचे प्रदूषण यासारख्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत आहेत व भविष्यातही भेडसावतील, यावरती उत्तम उपाय म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला पाहिजे आणि त्यासाठी सदैव वृक्षारोपण हे केलेच पाहिजे कोपरगाव मध्ये कोपरगाव ग्रीन फोरम या नावाने एक एनजीओ स्थापन करून आम्ही हे वृक्षारोपणाचे काम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर बी एस गायकवाड यांनी शिबिरादरम्यान केलेल्या कामाचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला व गावाने केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. डाऊच बु. गावचे सरपंच दिनेश गायकवाड, उपसरपंच भिवराव दहे व ग्रामपंचायत सदस्य यांनी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.बी.एस. गायकवाड,प्रा. डॉ. एस. एस. नागरे,प्रा. येवले मॅडम यांचा सत्कार केला. या कार्यक्रमासाठी प्रेरणादायी म्हणून कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव संजीवजी कुलकर्णी, के. जे. सोमैया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी एस. यादव, उपप्राचार्य डॉ. एस. आर.पगारे, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.डॉ. व्ही.सी. ठाणगे, महाविद्यालयाचे प्रबंधक डॉ. अभिजीत नाईकवाडे व कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सर्व सदस्य यांचे मौलिक मार्गदर्शन मिळाले.

COMMENTS