Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रसमध्ये विलीन होण्याचा प्रश्‍नच नाही ः सुप्रिया सुळे

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर श

मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर सुप्रिया सुळेंची टीका
चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे
अजितदादा आणि आमच्यात मनभेद नाही

पुणे ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवारांचा गट काँगे्रसमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी बुधवारी वेग घेतला होता. मात्र शरद पवार गट काँगे्रसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा निराधार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीसंदर्भात शरद पवारांनी बुधवारी पुण्यात बैठक बोलवली होती. मात्र ही बैठकच शरद पवार गट काँगे्रसमध्ये विलीन करण्यासाठी बोलावल्याच्या चर्चा होत्या. मात्र बैठकीनंतर अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा सुळे यांनी केला आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील उपस्थित होते. पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना आमदार रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची जी बातमी माध्यमांत येत आहे, त्यावर आमच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. आजच्या बैठकीत शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या कामाबाबत नियोजन व चर्चा झाली. आमच्याविषयी खोट्या बातम्या कोण कोण पेरत आहे हे तपासून पाहावे लागेल. भाजप या प्रकरणी कोणत्याही पातळीवर घसरू शकतो, त्यामुळे माध्यमांनी ऐकीव गोष्टींवर आधारित बातम्या देऊ नये, असे ते म्हणालेत. आमच्या पक्षाच्या चिन्हाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी मधील घटकपक्षांत योग्य प्रकारे चर्चा सुरू आहे. 40 जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित 8 आम्ही चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ. शेतकरी आधारभूत किंमतीची मागणी करत राजधानी दिल्लीकडे जात आहेत. त्यांच्यावर लाठीमार, पाण्याचा मारा व अश्रुधुराचा मारा करणे चुकीचे आहे. शेतकर्‍यांवर हल्ला होताना उपमुख्यमंत्री अजित पवार त्याबाबत काही बोलत नाही हे विशेष आहे. केंद्रातील सरकार शेतकरी विरोधी असल्याचे वारंवार दिसून येते. एका बाजूला किसान सन्मान म्हणतात आणि शेतकरी त्यांच्या न्याय हक्काची मागणी करताना त्यांच्यावर अश्रुधर आणि लाठ्या चालवलेल्या जात आहे, असे रोहित पवार म्हणाले.

COMMENTS