चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत ? – सुप्रिया सुळे

टिकलीवर बोलणारे आता कुठे गेले? : चित्रा वाघचा सवाल

मुंबई - मराठी वृत्तवाहिन्यांत काम करणार्‍या पत्रकार मुली साडी का नाही नेसत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) य

महाराष्ट्रातही ’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा हवा – चित्रा वाघ
असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…
भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत

मुंबई – मराठी वृत्तवाहिन्यांत काम करणार्‍या पत्रकार मुली साडी का नाही नेसत?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी असे वक्तव्य करताच भाजपने त्यांना टिकली वादावरून लक्ष्य केले आहे. मुलींना टिकली घाल सांगणार्‍यांवर टीकेची झोड उठणारे, आता बोलणार का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
एका कार्यक्रमात भाषण करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चॅनलमधील पत्रकार मुली साडी का नाही नेसत?. त्या नेहमी शर्ट आणि ट्राऊझरच का घालतात? चॅनेलमध्ये या मुली मराठीतून बोलतात, मराठी संस्कृतीवर गप्पा मारतात. मात्र, महाराष्ट्राची पारंपारिक वेशभूषा करत नाहीत. त्यांच्यावर पाश्‍चिमात्य संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. सुप्रिया सुळे म्हणाल्या, चॅनेल्समध्ये फक्त दिवाळी किंवा इतर सण असले की पत्रकार मुली साडी नेसतात. आपण आत्मनिर्भर भारताच्या गप्पा मारतो. मग आत्मनिर्भर महाराष्ट्र का नाही. चॅनेलवाले एवढे मराठी, मराठी करतात. मग त्यासाठीचे नियम, कायदे काय फक्त आम्हाला आहेत का? तसेच, स्टार्ट विथ बेसिक, असा खोचक सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावर भाजप नेते चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, ’टिकली’वर टीका करणारे आता ’साडी’वरून या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या.

COMMENTS